नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : तसं पाहिलं तर स्वप्नं हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिला आहे. पण स्वप्न शास्त्रानुसार (According to dream science), एखादी व्यक्ती झोपेत जी काही स्वप्नं (dream) पाहते, त्याचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. स्वप्नं भविष्यातील घटनांचं भाकीत करतात. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात प्राणी दिसणं देखील शुभ किंवा अशुभ संकेत देतं. जाणून घेऊ स्वप्नात 5 प्राणी दिसण्याचा (Seeing animals in a dream) काय अर्थ होतो. स्वप्नात हत्ती दिसणं झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, स्वप्नात हत्ती दिसणं शुभ लक्षण मानलं जातं. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात हत्ती दिसणं हे सुख-समृद्धीचं लक्षण आहे. जर एखाद्याला तो स्वतः स्वप्नात हत्तीवर स्वार झालेला दिसला तर, त्याचा अर्थ असा होतो की, येणाऱ्या काळात त्याच्या घरात सुख-शांती नांदेल. स्वप्नात गाय दिसणं स्वप्नात गाय दिसणं खूप शुभ मानले जाते. स्वप्नात गाय पाहणं हे सूचित करतं की, भविष्यात आनंदाच्या साधनांमध्ये वाढ होईल. तसंच, स्वप्नात पांढरी गाय दिसल्यानं संपत्ती मिळते. तर, स्वप्नात वासरू दिसलं तर, याचा अर्थ उत्पन्न वाढणार आहे. हे वाचा - बेडरूममध्ये पलंगाच्या आत किंवा खाली या वस्तू ठेवू नये; होऊ शकते आर्थिक नुकसान स्वप्नात कुत्रा दिसणं स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नात कुत्रा दिसणं शुभ असतं. जर स्वप्नात कुत्रा चावताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की, लवकरच तुमची काही समस्या दूर होईल. तर, स्वप्नात कुत्रा पळताना दिसला, तर जीवनशैली सुधारत असल्याचं लक्षण असतं. हे वाचा - लाल, निळा की काळा? रंगाच्या आवडीवरून समजतं तुमची Personality कशी आहे स्वप्नात मांजर किंवा बेडूक दिसणं स्वप्नात मांजर दिसणे हे शुभ लक्षण आहे. स्वप्नात वन्य मांजर पाहणे हे ध्येय साध्य करण्याचे संकेत देते. याशिवाय, हे स्वप्न करिअरमध्ये प्रगती दर्शवते. तर दुसरीकडे स्वप्नात बेडूक दिसणे शुभ मानले जाते. जर एखाद्याने स्वप्नात बेडूक पकडले तर याचा अर्थ असा आहे की कौटुंबिक आनंद येणार आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य स्वप्न शास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.