मुंबई, 27 जुलै : मस्त पाऊस पडतो आहे, वातावरणात गारवा आहे. अशा दिवसात वीकेन्ड कसा एन्जॉय करायचा याचे प्लॅन तुम्ही करत असाल. मुसळधार पावसामुळे जर बाहेर जाता येत नसेल तर घरातच बसूनच तुम्ही मस्त वाईनचे घुटके घेत वीकेन्ड साजरा करू शकता. रूटीनचा कंटाळा आला असेल आणि कामाचा ताण जाणवत असेल तर वाईनसारखं दुसरं काही नाही आणि त्यातच ज्यांना वाईन आवडते त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे. रेड वाईन घेतल्यामुळे नैराश्य कमी होतं, असं संशोधकांना आढळून आलं आहे. रेड वाईनमधल्या रेसव्हेट्रोल या घटकामुळे मनावरचा ताण हलका होतो. ज्या रुग्णांना नैराश्य आहे त्यांच्यासाठी रेसव्हेट्रोल हे पर्यायी औषध होऊ शकतं, असंही संशोधकांचं म्हणणं आहे. अमेरिकेतल्या बफेलो युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर यिंग झु यांनी हे संशोधन केलं आहे. द्राक्षांच्या बिया आणि सालांमध्ये आरोग्याला पूरक असे घटक असतात. त्याचा आपल्या मज्जासंस्थेवर चांगला परिणाम होतो, असं संशोधनात आढळून आलं आहे. PHOTO : महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांच्या सुटकेचा 17 तासांचा थरार अतिताणामुळे आपल्या शरीरात कॉर्टिकोस्टेरॉन नावाचं विकर तयार होतं. रेड वाईनमधला रेसव्हेट्रोल हा घटक या विकराचा परिणाम कमी करतं. त्यामुळे ताण हलका होतो आणि नैराश्य येण्याची शक्यताही कमी होते. रेड वाईनमध्ये ताण कमी करणारे घटक असले तरी मद्यपान करणं हे आरोग्यासाठी हितकारक नाही आणि त्याचं व्यसन लागू शकतं, असाही इशाराही संशोधकांनी दिला आहे. त्यामुळे वाईन घ्यायची असली तरी ती बेतानं घेतलीत तर मनावरचा ताण हलका होऊ शकतो आणि आरोग्याचंही नुकसान होणार नाही. ================================================================================================ VIDEO: धक्कादायक! 3 सेकंदात पत्त्यासारखी कोसळली इमारत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.