बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान कोल्हापूरकडे जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली. इथल्या रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं आहे. महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बोटीने सुखरूप काढण्यात आलं. प्रवाशांच्या सुटकेसाठी नौदल आणि हवाई दलाची हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली. वांगणी आणि बदलापूरचा पूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे. महालक्ष्मी एक्सप्रेसच्या सगळ्या प्रवाशांची आता सुखरूप सुटका करण्यात आली आहे. महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या प्रवाशांनी रेक्स्यू ऑपरेशनचा थरार अनुभवला. पूर्ण परिसरातच पाणी साचल्यामुळे रेल्वेरूळही पाण्याखाली गेले. महालक्ष्मी एक्सप्रेसला चहूबाजूंनी पाण्याचा वेढा पडल्यामुळे पाण्यातून वाट काढत बचावकार्य करावं लागलं. महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांनी पावसामुळे हा सुटकेचा थरार अनुभवला. या बचावकार्यात स्थानिक गावकऱ्यांनीही मदत केली. प्रवाशांनी जीव मुठीत धरून बोटीतून असा प्रवास केला. महालक्ष्मी एक्सप्रेसचं हे बचावकार्य आता पूर्ण झालं आहे.