नागपूर, 21 ऑक्टोबर : प्रत्येक शहराला आपली खास ओळख लाभलेली असते. त्याप्रमाणे त्या शहराची आपली आगळीवेगळी खाद्यसंस्कृती देखील वैशिष्ट्यपूर्ण असते. सावजी झणझणीत चिकन, मटण, तसेच आमरस, बासुंदी सोबत हमखास फर्माईश केली जाणारी माठावरच्या लांब रोटी नागपूरची फेमस आहे. या लांब रोट्यांनी नागपूरची एक आगळीवेगळी ओळख जपली असून नागपूरच्या खाद्य संस्कृतीचे वैभव बनले आहे. खवय्ये अगदी आवडीने या रोट्यांवर ताव मारतात. लांब रोट्या प्रामुख्याने विदर्भातील नागपूर येथेच जास्त प्रचलित आहेत. नागपुरातील रामेश्वरी, शताब्दी चौक, इंदोरा, बजाज नगर परिसात या रोटी मिळतात. गृह उद्योग करणाऱ्या महिला देखील या रोटी बनवून देतात. महिला पाठोपाठ पुरुष देखील या रोट्यांचा व्यवसाय करताना दिसतात. लांब रोट्या तयार करणे म्हणजे मोठ्या कौशल्याचा आणि मेहनतीचे काम आहे.मात्र त्यांची चव आणि त्यातून मिळणारा आनंद खवय्यांसाठी काही औरच असतो. या पदार्थांसोबत घ्या मटका रोटीचा अस्वाद लांब रोट्या प्रामुख्याने मटण, चिकन, बासुंदी, खीर, आंबरस, पटोडी अशा पदार्थासोबत चवीने खाल्ल्या जातात. आमच्या येथील लांब रोट्या खाण्यासाठी लांबून लांबून लोक येत असतात. रोट्या तयार करण्यासाठी स्वच्छ्ता, उच्च प्रतीची साहित्य, वापरले जाते. त्यामुळे या रोट्या ग्राहकांना देखील आवडत असून याची मोठी मागणी असल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले. Video : सिक्रेट मसाला आणि कोळशावरची तर्री, बन्सी पाव भाजीची चव लईच न्यारी सिक्रेट रेसिपी लांब रोट्यासाठी लोकवन गव्हाचे पीठ वापरण्यात येतं. गहू बारीक दळून आणून ते 15-20 मिनिटे भिजून घालावं लागतं. त्यानंतर मोठ्या परातीमध्ये पीठात प्रमाणबद्ध पाणी टाकत पीठ भिजवून ते पटकले जाते. पिठात पाणी टाकून आणि पटकून पटकून त्यात चिक्की येईपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवली जाते. यात वेळेचे नियोजन अतिशय महत्त्वाचे असते. पीठ पूर्णपणे तयार झाल्यानंतर पिठाचा गोळा हातावर लांब करून विशिष्ट कौशल्याने माठावर टाकला जातो, अशी माहिती संदीप शिंदे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.