जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : सिक्रेट मसाला आणि कोळशावरची तर्री, बन्सी पाव भाजीची चव लईच न्यारी

Video : सिक्रेट मसाला आणि कोळशावरची तर्री, बन्सी पाव भाजीची चव लईच न्यारी

Video : सिक्रेट मसाला आणि कोळशावरची तर्री, बन्सी पाव भाजीची चव लईच न्यारी

राजस्थानहून बीडमध्ये आलेल्या प्रजापती बन्सी यांनी बीडमध्ये बन्सी पावभाजी सेंटर सुरू केले. बीडकर या स्ट्रीट फूडचा आवडीने आस्वाद घेतात.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    बीड, 15 ऑक्टोबर :  स्ट्रीट फूडच्या बाबतीत बीड देखील मागे राहिले नाही. बीडमध्ये काही असे स्ट्रीट फूड मिळतील जे पाहताच तुम्ही स्वतःला खाण्यापासून थांबवू शकणार नाही. त्यातील एक फेमस स्ट्रीट फूड म्हणजे पाव भाजी. राजस्थानहून बीडमध्ये आलेल्या प्रजापती बन्सी यांनी बीडमध्ये बन्सी पावभाजी सेंटर सुरू केले. बीडकर या स्ट्रीट फूडचा आवडीने आस्वाद घेतात. पावभाजी हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ असून तो शहरापासून ते गावापर्यंत वेगवेगळ्या चवीमध्ये खावासा वाटतो. बीडमध्ये देखील अशीच चवदार पावभाजी मिळते. खवय्ये झणकेबाज पावभाजी खाण्यासाठी नेहमी गर्दी करतात. बीड शहरातील बस स्थानकासमोर प्रजापती बन्सीलाल यांनी 1985 साली पावभाजीच्या विक्रीस सुरुवात केली. ते व्यवसायासाठी राजस्थानहून बीडमध्ये आले होते. त्यावेळी या पावभाजीबद्दल लोकांना अधिक माहिती नव्हती. व्यवसाय सुरू केला तेव्हा पाच रुपये प्लेट प्रमाणे पावभाजी विक्री केली जायची. आता हीच पावभाजी 45 रुपये प्लेट झाली आहे. घरगुती सिक्रेट मसाले सकाळी अकराच्या सुमारास बन्सी पावभाजी सेंटर सुरू होते. या ठिकाणी प्रजापती बन्सी लाल आणि त्यांचे दोन मुले आणि काही कामगार पावभाजी बनवतात. पावभाजीचे स्टॉल, हॉटेल अनेक ठिकाणी असतात मात्र, येथील पावभाजी विशिष्ट चवीची बनते ती येथील घरगुती सिक्रेट मसाल्यांमुळे. निसर्गरम्य वातावरणात खा चुलीवरची अस्सल झणझणीत मिसळ, Video कोळशावर तयार होते तर्री पावभाजीसाठी लागणारी तर्री मागील 30 वर्षांपासून आजही कोळशावरच तयार केली जाते. त्यामुळे ही अधिक चवदार बनते. पावभाजीची प्लेट बटर कांद्याने सजवून खवय्यांपर्यंत पोहोचवली जाते. प्लेट पाहताच खवय्यांच्या तोंडाला अगदी पाणी सुटते. खवय्ये पावभाजी प्लेटवर ताव मारतात. काही खवय्ये तर एकामागे एक अशा दोन- तीन प्लेट फस्त करतात. दररोज दीडशे पावभाजी प्लेटची विक्री होते. जेवढ्या प्लेट हॉटेलमध्ये खाल्या जातात तेवढ्यात पार्सलही नेल्या जात असल्याची माहिती यांनी दिली.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात