मुंबई, 30 जुलै : फ्रेंच फ्राईज हा खूप चवदार आणि सर्वांचा आवडता पदार्थ आहे. हे फ्रेंच फ्राईज बटाट्यापासून बनवले जातात. लोक अगदी बिन्दास्त आणि मोठ्या प्रमाणात या फ्राईजचे सेवन करतात. लहान मुलांना तर हे विशेष आवडतात. मात्र तुम्हाला माहित आहे का? फ्रेंच फ्राईज खाल्याने केवळ आपले वजनच वाढत नाही तर आपल्या आरोग्यालादेखील धोका असतो. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी काही हेल्दी आणि टेस्टी फ्राईजच्या रेसिपी घेऊन आलो आहोत. एकदा नक्की बनवून पाहा. मुलांनादेखील खूप आवडतील.
चना फ्राईज
E Times ने या रेसिपी शेअर केल्या आहेत. यातील पहिली रेसिपी आहे, चना फ्राईज. हे फ्राईज बनवण्यासाठी आधी २ वाट्या चणे रात्रभर भिजवा. त्यानंतर धुवून उकळून घ्या. नंतर चणे लसूण, आले, हिरवी मिरची आणि चवीनुसार मिरपूड, लाल तिखट, मीठ या सर्वांची जाडसर पेस्ट बनवून घ्या.
नंतर त्यात थोडे कॉर्नफ्लोअर घालून पीठ मळून घ्या. या पीठाचा एक बॉल घेऊन जाडसर लाटा आणि फ्राईजच्या आकारात कापून घ्या. नंतर थोडे ऑलिव्ह ऑइल, मीठ आणि मिरपूडच्या मिश्रणाने ब्रश करा आणि बेक करा. तुम्ही याला एअर फ्राय किंवा डीप फ्रायदेखील करू शकता.
Health Tips: शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी डबा बनवताय? 'या' हेल्दी टिप्स एकदा पाहाच
ब्रेड फ्राईज
ही रेसिपी कोणत्याही उरलेल्या ब्रेडपासून बनवता येते. फक्त ब्रेडचे तुकडे फ्रेंच फ्राईजच्या स्वरूपात कापून घ्या. एक बाऊलमध्ये 1 चमचा ओरेगॅनो, 1 चमचा पेपरिका, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा चिरलेला लसूण, 2 चमचे ऑलिव्ह ऑईल, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
Healthy Recipe : मुलं बीट खात नाहीत? बनवा हे हेल्दी आणि टेस्टी बीटरूट-बटाटा कटलेट
मिश्रण फेटून घ्या. त्यानंतर एक पर्चमेंट पेपर घ्या आणि त्यावर ब्रेडच्या पट्ट्या घेऊन ते मिश्रण या पाट्यांवर दोन्ही बाजूंनी लावा. ओव्हनमध्ये 20 मिनिटे बेक करा किंवा ते कुरकुरीत होईपर्यंत एअर फ्राय करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.