Home /News /lifestyle /

Healthy Recipe : मुलं बीट खात नाहीत? बनवा हे हेल्दी आणि टेस्टी बीटरूट-बटाटा कटलेट

Healthy Recipe : मुलं बीट खात नाहीत? बनवा हे हेल्दी आणि टेस्टी बीटरूट-बटाटा कटलेट

ब्रेकफास्ट नेहमी आरोग्यदायी आणि चविष्ट असा असावा असे प्रत्येकाला वाटते. बीटरूट बटाटा कटलेट या दोन्हींची पूर्तता करते. ही रेसिपी लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडते.

  मुंबई, 24 जुलै : बीटरूट आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बीटरूट आणि बटाटा एकत्र करून तयार केलेले कटलेट्स हेल्दी तसेच चवीला उत्कृष्ट असतात. बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्याची रेसिपी हा घरांमध्ये मोठा प्रश्न असतो. ब्रेकफास्ट नेहमी आरोग्यदायी आणि चविष्ट असा असावा असे प्रत्येकाला वाटते. बीटरूट बटाटा कटलेट या दोन्हींची पूर्तता करते. ही रेसिपी लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडते. तुम्ही ही रेसिपी अजून ट्राय केली नसेल तर अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. बीटरूट बटाटा कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य बीटरूट - 2 बटाटा - 2 जिरे पावडर - 1 टीस्पून लाल तिखट - 1/2 टीस्पून चाट मसाला - 1/2 टीस्पून तेल - तळण्यासाठी मीठ - चवीनुसार `हे` नैसर्गिक पेय आहे अतिशय आरोग्यदायी; झटपट वजन कमी करण्यापासून निरोगी त्वचेपर्यंत अनेक फायदे बीटरूट बटाटा कटलेट कसे बनवायचे बीटरूट आलू कटलेट बनवण्यासाठी प्रथम बटाटे आणि बीटरूट उकडून घ्या. यानंतर बटाट्याची साल काढून मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊन मॅश करा. यामध्ये बीटरूट देखील टाका, आणि दोन्हीही व्यवस्थित मॅश करून एकजीव करून घ्या. नंतर यामध्ये जिरेपूड, लाल तिखट, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व मिश्रण नीट मिसळा. आता हे मिश्रण हातावर घ्या आणि याचे कटलेट तयार करा.

  तुम्हालाही आहे हाय कोलेस्ट्रॉलची चिंता? 'या' 5 तेलांचा स्वयंपाकात करा समावेश

  कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात आधीच तयार केलेले कटलेट्स एक एक करून टाका. त्यानंतर कटलेट तळून घ्या. त्यांचा रंग गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. कटलेट चांगले तळण्यासाठी 4-5 मिनिटे लागतील. त्याचप्रमाणे सर्व कटलेट तळून घ्या. तुमचे बीटरूट बटाट्याचे कटलेट नाश्त्यासाठी तयार आहेत. त्यांना चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Food, Health Tips, Lifestyle, Recipie, Tasty food

  पुढील बातम्या