जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / आता तुम्हीही बनवा, खापरावरची पुरणपोळी म्हणजेच खान्देशी मांडे! पाहा Video

आता तुम्हीही बनवा, खापरावरची पुरणपोळी म्हणजेच खान्देशी मांडे! पाहा Video

आता तुम्हीही बनवा, खापरावरची पुरणपोळी म्हणजेच खान्देशी मांडे! पाहा Video

खान्देशात मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते. त्याला मांडे असं म्हणतात. हे मांडे कसे बनवतात हे आपण पाहूया

  • -MIN READ Local18 Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 28 डिसेंबर : पुरणपोळी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्वाचा पदार्थ आहे. राज्याच्या प्रत्येक भागात ही बनवण्याची खास पद्धत आहे. खान्देशात  मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते. त्याला मांडे असं म्हणतात. हे मांडे कसे बनवतात हे आपण पाहूया मांडे बनवण्याची कृती मांडे बनवण्यासाठी गव्हाचे पीठ बारीक दळून आणावे आणि कापडाने चाळून घ्यावे. त्याशिवाय बारीक रवा देखील या पुरणपोळीसाठी चालतो. अनेक ठिकाणी रव्या मैद्याच्याही पुरणपोळ्या केल्या जातात. या प्रकारच्या पुरणपोळ्या करायला सोप्या जातात. ही पोळी करण्यासाठी सुरूवातीला सैलसर पीठ मळून घ्यावे आणि ते वीस मिनिटं झाकावं. त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ शिजवून त्यामधील उरलेलं पाणी काढावं आणि ते आमटीसाठी वापरावे. डाळीमध्ये गूळ टाकून ती पुन्हा शिजवावी आणि पुरण यंत्रातून वाटावी. त्यामध्ये जायफळ, वेलची पूड घालून पुरण थंड करुन घ्यावे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    पिठाची बारीकशी गोळी घेऊन त्याच्यामध्ये थंड झालेले पूरण भरावे. पहिले हाताने हलके हलके पुरणपोळी थापावी त्यानंतर हलक्या हाताने लाटणे फिरून मोठी करावी. या पोळीला मोठं करण्यासाठी हात आणि कोपऱ्याचा वापर करावा. ही पद्धत अवघड असली तरी सरावानं जमू शकते. नाश्त्यासाठी करा क्रिस्पी आणि पौष्टिक गव्हाचा चिवडा, पाहा Video ही पुरणपोळी तव्यावरनं न भाजता खापर, मडक, अथवा कढईच्या उलट्या भागावर भाजायला टाकावी. खान्देशी पुरणपोळी तव्यावर न भाजता चुलीवरील खापरावर भाजली जाते, ही याची मुख्य खासियत आहे. ते. एक बाजू भाजून झाल्यानंतर दुसरी बाजू भाजून ही पोळी अलगदपणे काढावी. त्यानंतर साजूक तूप घालून पुरणपोळी खायला द्यावी.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात