जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chivda Recipe : नाश्त्यासाठी करा क्रिस्पी आणि पौष्टिक गव्हाचा चिवडा, पाहा Video

Chivda Recipe : नाश्त्यासाठी करा क्रिस्पी आणि पौष्टिक गव्हाचा चिवडा, पाहा Video

Chivda Recipe : नाश्त्यासाठी करा क्रिस्पी आणि पौष्टिक गव्हाचा चिवडा, पाहा Video

आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी गव्हाचा चिवडा ही एक नवीन डिश सांगणार आहोत. वाफवलेल्या गव्हाचा हा चिवडा रुचकर आणि पौष्टिक असतो.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नंदूरबार, 27 डिसेंबर : रोज नाश्त्याला नवं काय खायचं हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. रोजचा नाश्त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ खाल्ले तर जीभेवरील चव कायम राहते. आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी गव्हाचा चिवडा ही एक नवीन डिश सांगणार आहोत. वाफवलेल्या गव्हाचा हा चिवडा नंदूरबार जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. विशेषत: गुर्जर संस्कृतीत गव्हाचा चिवडा बनवला जातो. त्यासाठी गव्हाला वाफवले जाते. साधे गहू तीन दिवस पाण्यात भिजवून चौथ्या दिवशी त्यांना पाण्याबाहेर काढून विविध मसाल्याचे पदार्थ लावून दाबून रात्रभर ठेवले जातात व सकाळी हे गहू उन्हामध्ये वाळवण्यासाठी टाकले जातात .तीन ते चार दिवस हे उन्हात वाळवून मग यांना भाजून फोडणी दिले जातात.पूर्वा पाटील यांनी या चिवड्याची रेसिपी आपल्याला सांगितली आहे. गव्हाचा चिवडा बनवण्यासाठी साहित्य आणि प्रमाण 1)वाफवलेले गहू- एक वाटी 2) शेंगदाणे-पाऊण वाटी 3)डाळ्या -पाऊन वाटी 4)लसणाच्या-15 ते 20 पाकळ्या 5) अख्खेधने -फोडणीत चवीनुसार 6)बारीक दळलेली साखर-चवीनुसार 7) तेल -फोडणीपुरते 8)मीठ -चवीनुसार 9)कढीपत्ता -चार ते पाच काड्या. 10)जिरे-फोडणी पुरते 11)हिंग-फोडणी पुरते 12)हळद-फोडणी पुरते. 13)लाल तिखट-फोडणी पुरते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    चिवडा बणवण्याची पद्धत प्रथम लोखंडाच्या कढईत अर्धी वाटी मीठ टाकून तापवायला ठेवावे .त्यात हे गहू मूठभर टाकून सारखे हलवायचे .गहू चांगले फुटल्यानंतर त्यांना चाळणीत टाकून मीठ वेगळे करून पुन्हा ते मीठ कढईत टाकून पुन्हा गहू टाकायचे व चांगले भाजायचे व मीठ वेगळे करत करत सर्व गहू भाजून घ्यावे. त्याच कढईत प्रथम तेल तापवायला ठेवावे. शेंगदाणे ,डाळ्या एक एक करून तळून भाजलेल्या गव्हात टाकावे. मंद आचेवर नंतर त्यात लसणाच्या कापळ्या टाकून चांगल्या लाल होऊ द्यायच्या. मग कढीपत्ता टाकायचा .नंतर त्यात धने,जीरे टाकायचे .मग मीठ, लाल तिखट ,हळद ,हिंग हे पदार्थ टाकून गॅस बंद ठेवायचा आणि भाजलेल्या गहू शेंगदाणे डाळ्या मिश्रित मिश्रण त्यात टाकायचं व परतवून घ्यायचे. पुन्हा गॅस सुरु करून पुन्हा परतवायचे.वरून त्यात बारीक दळलेली साखर टाकून पुन्हा फ्राय करून घ्यायचे . घरीच सोप्या पद्धतीनं बनवा खान्देशी दाल बाटी, पाहा Recipe Video या पद्धतीनं गव्हाचा चिवडा तयार होतो. हा चिवडा खाण्यासही रुचकर आणि पौष्टिक असा असतो.  हा आरोग्यदायी चिवडा तुम्ही नक्की बनवा आणि सर्वांसोबत आनंदानं खा

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात