नंदूरबार, 26 डिसेंबर : महाराष्ट्रातील प्रत्येक भागातील खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य आहे. सर्व भागांमध्ये काही खास पदार्थ मिळतात. हे पदार्थ त्यांच्यातील वेगळेपणानं त्या भागाची ओळख बनली आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना खान्देश म्हणून ओळखले जाते. या परिसरातील दाल बाटी देखील चांगलीच प्रसिद्ध आहे. राजस्थानी दाल बाटीपेक्षा ही वेगळी असून त्याची रेसिपी तुम्ही आजवर कधी पाहिली नसेल. पुष्पा पाटील यांनी ही रेसिपी आपल्या सर्वांसाठी सांगितली आहे. दाल बाटीसाठी लागणारे साहित्य 1)पीठ - अर्धा किलो 2) हळद - एक चमचा 3)ओवा - एक चमचा 4) जिरे - एक चमचा 5) तेल-मोहणसाठी 6)पाणी - कणिक-मळण्यासाठी . कृती बारीक कापडाने पीठ गाळून घ्यावे. त्यामध्ये तेलाचे मोहन घालावे. मीठ, हळद ,जिरे आणि ओवा टाकून कणिक मळावी. त्यानंतर पाच ते दहा मिनिट ती कणिक झाकून ठेवावी. पाच मिनिटानंतर त्या कणकेला पुन्हा मळून घ्यावे . चांगली मऊ झाल्यानंतर त्याचे गोळे तयार करून पोळी लाटावी .त्याच्यावर तेल लावून त्याचे पोड करून,घडी वाळत जावे आणि मग हलक्या हाताने बट्टी वाळावी. अशाप्रकारे बट्ट्या तयार केल्यावर त्या उकळत्या पाण्यात सोडाव्या (किंवा वाफेवर वाफवून घ्याव्या.) पंधरा ते वीस मिनिट त्यांना चांगली उकळी आल्यावर त्या बट्ट्या पाण्याच्या वरती येतात व त्या चांगल्यापैकी शिजून जातात. Khandeshi Vangyache Bharit : न्यू इयर पार्टीला घरीच करा स्पेशल पदार्थ, पाहा Video त्यामधील पाणी निथळून कोरड्या कॉटनच्या कापडावर वाफ निघेपर्यंत पसरवून ठेवावे. नंतर पाच मिनिटानी बट्ट्या भाजण्याचं पात्र गॅसवर तापवायला ठेवावं व त्यावर या बट्ट्या एकेक रचून घ्याव्या.वरून झाकण पॅक करावे. मंद आचेवर या बट्ट्या चांगल्यापैकी खरपूस शेकल्या जातात. त्याला मध्येच पलटवून दोन्ही बाजूने या बट्ट्या चांगल्या शेकाव्या. छान पैकी त्या चेंडू सारख्या फुगा धरतात. बट्टी पूर्ण गुलाबीसर खरपूस अशी भाजल्यानंतर त्या भाजण्याच्या पात्रातून त्यांना बाहेर काढाव्या आणि फोडून त्यात तेल किंवा तूप सोडावे .अशाप्रकारे ही बट्टी चवीला स्वादिष्ट असते .तसेच पौष्टिकही असते. तुरीच्या डाळीच्या वरणासोबत ही बट्टी खाल्ली जाते.
आंबट-गोड तुरीच्या डाळीचे वरणासाठी लागणारे साहित्य. 1)तूर डाळ- 1कप 2)हळद- 1चमचा 3)हिंग-चवीनुसार 4)मीठ- चवीनुसार 5)जीरे- एकचमचा 6)आंबट चिंचपुड- साधारण दोन चमचे. 7) गुळ - अर्धा कप 8)लसणाच्या कापळ्या- 5-6 9)हिरवी मिरची- 2-3 11) आलं - अर्धा ईंच 10)लाल मिरची - 2 11)कोथिंबीर -चवीनुसार. 11-कढीपत्ता -एक काडी कृती सर्वप्रथम तूर डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी आणि उकळत्या पाण्यात कुकरमध्ये टाकावी. त्यात थोडेसे तेल, हळद आणि मीठ टाकून दोन शिट्ट्या होऊ द्याव्यात. डाळ शिजल्यानंतर तिला चांगल्यापैकी घोटून घ्यावे. डाळ शिजेपर्यंत दुसरीकडे चिंच,गुळ, शेंगदाणे भिजवावे. लसून,जिरे,हिरव्या मिरचीची पेस्ट करून घ्यावी. नाशिकमध्ये गेल्यावर नक्की खा, अस्सल घरगुती काळ्या मसाल्याची मिसळ, Video आंबट वरण बणवण्याची पद्धत डाळीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल टाकावे. त्यात मोहरी टाकून हिरवी मिरची लसूण,आले आणि जिऱ्याची पेस्ट टाकावी. फोडणीमध्ये कढीपत्ता, लाल मिरची आणि हिंग टाकावी. चांगला तडका आल्यानंतर त्यात चिंच,गूळ, शेंगदाणे भिजवलेलं कोळ टाकून थोडं उकळू द्यावे. ही घोटलेली डाळ त्यात टाकून हिंग टाकावी आणि चांगल्यापैकी उकळू द्यावं. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. या पद्धतीनं बाटी सोबत खाण्यासाठी आंबट वरण तयार होते.