नाशिक 20 डिसेंबर : नाशिकची झणझणीत मिसळ ही महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. अनेक मिसळ शौकीन हे नाशिकमध्ये येऊन मिसळचा आस्वाद घेत असतात. इथं प्रत्येक गल्लीत मिसळ मिळते. मिसळच्या या गर्दीत रविवार कारंजा परिसरातील लोकमान्य मिसळ सध्या चांगलीच चर्चेत आहे . घरगुती अस्सल काळ्या मसाल्यापासून ही मिसळ बनविली जाते. सुधीर अहिरे यांनी 1992 साली नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही मिसळ सुरू केली होती. घरगुती मसाले आणि दर्जेदार वस्तू ते पहिल्यापासूनच आपल्या मिसळ मध्ये वापरतात. त्यामुळे इथं ग्राहक नियमितपणे येतात. गेल्या काही दिवसांपासून आता त्यांची मिसळ ही रविवार कारंजा परिसरात सुरू आहे. या ठिकाणी देखील तितकीच गर्दी होते, अशी प्रतिक्रिया ओम अहिरे यांनी दिली आहे. घरगुती मसाल्याची मिसळ सुधीर अहिरे सुरूवातीपासून मिसळीसाठी घरगुती मसाले वापरतात. त्यांची आई हे सर्व मसाले बनवतात. बाहेरील कोणत्या ही वास्तू ते वापरत नाहीत. काळ्या मसाल्याची मिसळ अनेक जणांना आवडते. त्यांच्या मिसळमुळे कोणताही त्रास होत नाही. अगदी घरगुती पद्धतीने मिसळ बनवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. दीड रुपयांपासून सुरू झालेली बीडची फेमस कचोरी, पाहा Video महागाईमुळे सर्वांनीच मिसळचे दर वाढवलेले आहेत.मात्र इथं अजूनही 60 रुपये प्लेट असा मिसळचा दर आहे. त्यामध्ये मिसळसोबतच पापड,दही आणि पाव दिले जाते. ही एक प्लेट मिसळ खाल्ली की आपलं पोट भरतं.
ग्राहक काय म्हणतात? वर्षानुवर्षांपासून अनेक ग्राहक हे लोकमान्य मिसळला जोडले गेलेले आहेत. ते दररोज येऊन मिसळचा आस्वाद घेतात. ‘ही मिसळ खाल्ल्यामुळे पोटाचा कोणताही त्रास होत नाही. मिसळ एकदम झणझणीत आणि चमचमीत असते. त्यामुळे एकदा खाल्ली आपल्या पुन्हा खावीशी वाटते. अनेक दिवसांपासून मी मिसळ खायला येतो,’ अशी प्रतिक्रिया सिद्धेश संचेती या मिसळ प्रेमीनी दिली आहे.