मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

घरीच बनवा सोलापूरची जगप्रसिद्ध कडक भाकरी, पाहा सिक्रेट रेसिपीचा Video

घरीच बनवा सोलापूरची जगप्रसिद्ध कडक भाकरी, पाहा सिक्रेट रेसिपीचा Video

बरेच दिवस टिकणाऱ्या या भाकरीबद्दल सर्वांनाच कुतुहूल असतं. या भाकरीची सिक्रेट रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • Local18
  • Last Updated :
  • Solapur, India

 सोलापूर 24 नोव्हेंबर :  महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सोलापूर शहरात विविध भाषिक नागरिक कित्येक वर्षांपासून राहात आहेत. सोलापूरमध्ये कन्नड आणि तेलुगु भाषिक नागरिक अनेक वर्षांपासून राहात असून शहरातील संस्कृतीमध्येही त्यांचे प्रतिबिंब उमटले आहे. शहराच्या खाद्यसंस्कृतीवरही त्याचा प्रभाव आहे. सोलापूरची कडक भाकरी आणि शेंगाची चटणी ही जगप्रसिद्ध आहे. बरेच दिवस टिकणाऱ्या या भाकरीबद्दल सर्वांनाच कुतुहूल असतं. या भाकरीची सिक्रेट रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या रेसिपीनुसार तुम्हीही घरी सोलापूरची जगप्रसिद्ध कडक भाकरी बनवू शकता.

सोलापूरच्या सुजाता नागमोती या गेल्या 18 वर्षापासून कडक भाकरी बनवत आहेत. त्या दिवसाला साधारणपणे त्या दोनशे ते अडीशे इतक्या भाकरी बनवतात. सुजाता यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी पडली. या अवघड परिस्थितीमधून सावरण्यासाठी त्यांना कट्टी भाकरी बनवण्याच्या कलेनं मदत केली.

ही भाकरी बनवताना चूल आणि मूल इतकेच न करता त्यांनी स्वतःचा ब्रँड तयार केला आहे.  ज्वारी आणि बाजरी या दोन धान्याच्या भाकरी सोलापुरात मिळतात. ही भाकरी खाल्यानं पचन क्षमता वाढते त्याबरोबरच ही  जास्त दिवस टिकते त्यामुळे अगदी विदेशातील मंडळीही सोलापूरात आल्यावर ही भाकरी घेऊन जातात.

बार्बेक्यूला 'देसी तडका', अस्सल सोलापुरी स्टाईलच्या हॉटेलची शहरात चर्चा

कडक भाकरी कशी तयार करावी?

- कडक भाकरी आपण बाजरी किंवा ज्वारी या दोन्ही पिठाच्या बनवू शकतो.

- प्रथम एका भांड्यात पीठ घेऊन मीठ आणि पाणी यांचे योग्य मिश्रण करून ते पीठ मळून घ्यावे.

- पीठ मळताना एकच काळजी घ्यावी की घरगुती भाकरी करताना ज्याप्रकारे आपण पीठ घट्ट मळून घेतो, परंतु कडक भाकरी बनवताना पीठ थोडेसे पातळ मळून घ्यावे.

- पिठाचे उंडे करून समान भागात ते वेगळे करून घ्यावेत.

- हातावर कोरडे पीठ लावून त्यावर ज्वारीचे किंवा बाजरीचे मळलेले पिठाचे उंडे चपटे करून घ्यावेत.

- तव्यावरील गॅस थोडा वाढवून तवा चांगला गरम होऊ द्यावा.

हैदराबादी मिरचीचे स्पेशल आंध्र भजी, एकदा खाल तर पुन्हा मागाल, Video

- हातावर घेतलेल्या उंड्यावर तीळ लावून तो चारही बाजूने संपूर्ण पातळ होईपर्यंत भाकर थापून घ्यावी.

- भाकरी थापताना भाकरीच्या मध्यभागी जर सर्वात पातळ भाग दिसू लागला की भाकर थोपणे थांबवावे.

- त्यानंतर भाकरी तव्यावर भाजून घ्यावी.

- तव्यावर भाकरी भाजताना एकच काळजी घ्यावी की भाकरीला पाणी लावताना सर्व बाजूने समान पद्धतीने कापडाचा बोळा पाण्याने भिजवूनच लावावा.

- पाण्यामुळे भाकरी तुटत नाही आणि गॅस थोडा बारीक करून मंद आचेवर दुसऱ्यावर तुम्ही भाकरी भाजून घ्यावी.

- आपण लावलेला ओलसरपणा भाकरीतून निघून जाईल आणि भाकरी कडक बनेल.

गुगल मॅपवरून साभार

संपर्कासाठी क्रमांक :  निखिल नागमोती - +91 95957 29962

First published:

Tags: Local18, Local18 food, Recipie, Solapur