मुंबई, 11 जुलै : खाद्य पदार्थ साठवण्यासाठी थंड तापमान अधिक सुरक्षित आणि चांगले मानले जाते. अतिथंड तापमान अन्न खराब करू शकणारे सूक्ष्म जीव आणि जीवाणूंची हालचाल थांबवण्यास मदत करते. म्हणूनच कच्चे मांस आणि काही भाज्या आणि पदार्थांचे तापमान कमी असावे. काही भाज्या थंड तापमानात चांगल्या राहतात. परंतु, काही पदार्थ नैसर्गिक हवेत ठेवल्यानंतरच चांगले राहतात. शीतगृहात ठेवल्याने उलट खराब होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खराब (Fridge Use Tips) होतात. कच्चा टोमॅटो खोलीच्या तपमानावरच ठेवावा जेणेकरून त्यात अधिक चव आणि रस तयार होईल. जास्त थंड तापमानात ठेवल्यास टोमॅटोची चव खराब लागते. पूर्णपणे शिजवल्यानंतर चांगल्या दर्जाच्या प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. परंतु, त्यांचा वापर करण्यापूर्वी आपण त्यांना किमान अर्धा तास खोलीच्या तपमानावर (Fridge Right Use) ठेवावे. साल नसलेल्या कांद्याला हवा लागते. फ्रीजमध्ये ठेवल्यास ते ओलाव्यामुळे मऊ होऊ शकतात. पण सोललेले कांदे फ्रीजमध्ये ठेवू शकता. बरेच लोक काजू खराब होण्यापासून रोखण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात. परंतु, असे केल्याने काजू चांगले राहण्याऐवजी खराब होऊ शकतात. थंड तापमान त्यांची चव खराब करू शकते. फ्रीजमधील इतर पदार्थांचे वास देखील त्यामध्ये शोषले जातात. लसूणदेखील फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खराब होऊ शकतो. लसूण फ्रीजमध्ये ठेवला तर त्याला अंकुर फुटू शकतात आणि तो मऊ होऊ शकतो. त्यामुळे लसूण नेहमी कोरड्या जागेत ठेवावा. हे वाचा - Health Tips : रात्रीच्यावेळी कोणत्या कुशीवर झोपणे असते अधिक फायदेशीर? बटाटे फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. आपण त्यांना जास्त थंड तापमानात ठेवले तर त्यातील स्टार्चचे साखरेत रुपांतर होईल. वापरण्यापूर्वी ते धुवू नयेत, कारण त्यातील ओलावा खराब होण्याचा धोका असतो. हे वाचा - महागड्या आणि केमिकल हेअर रिमूव्हल क्रीम खरेदी करू नका; हा आहे सोपा घरगुती उपाय मधदेखील फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. कारण बाहेर ठेवल्यावरही तो चांगला आणि ताजा राहू शकतो. फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचे क्रिस्टलायझेशन होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.