मुंबई, 11 फेब्रुवारी : ब्रिटिश साम्राज्यापासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी लाॅर्ड माऊंटबॅटन यांना भारतात पाठवलं होतं. एडविना माऊंटबॅटन (Edwina Mountbatten) त्यांची पत्नी होती. पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) आणि एडविना यांच्यात आत्मिक नातं होतं, यात काहीच शंका नाही. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. पण हे नातं त्या दिवसात किती पुढे गेलं होतं याबद्दल संभ्रम आहे. नेहरू आणि एडविना यांच्यात होणाऱ्या भेटींमुळे दोघांमध्ये एक आत्मियता निर्माण झाली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ती कायम राहिली. जोपर्यंत नेहरू जिवंत होते, तोपर्यंत ते एडविना यांना पत्र लिहियचे. ब्रिटनमध्ये जाऊन भेटायचे. दर वर्षी एडविनाही भारतात यायच्या. आल्यावर पंतप्रधान यांच्या तीन मूर्ती या निवासस्थानी सरकारी पाहुण्या म्हणून राहायच्या. त्यांची मुलगी पामेला माऊंटबॅटननं हे स्वीकारलं होतं की नेहरू आणि तिची आई एकमेकांना पसंत करायच्या. भारतीय पत्रकारांशी बोलताना पामेलांनी सांगितलं होतं, ते दोघं एकमेकांच्या प्रेमात होते. पण दोघांमध्ये शारीरिक संबंध नव्हता. त्यांच्यातलं भावनिक आणि गहरं नातं सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडे होतं. नेहरूंची पत्नी कमला यांचं निधन झालं होतं. माऊंटबॅटन खूप व्यग्र असायचे. एडविना अंतर्मुख स्त्री होत्या. त्या फारशी कोणाशी संवाद साधत नसत. त्यामुळे नेहरू आणि त्यांच्यात होणाऱ्या संवादामुळे सगळे चकित झाले होते. भारत सोडून गेल्यावरही दोघं वर्षातून दोनदा तरी भेटायचे. जेव्हा नेहरू इंग्लडला जायचे तेव्हा ते हँपशायरमध्ये पाहुणे म्हणून राहायचे. दोघांमध्ये पत्रव्यवहार व्हायचा. ही गोष्ट लाॅर्ड माऊंटबॅटन यांनाही माहीत होती. एडविना यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीनं हा पत्रव्यवहार वाचला. खूप परिपक्व अशी ही पत्रं होती. हे वाचा - Love Story: जिच्या घराण्याशी होतं वैर तिच्याशी केलं लग्न,‘दादा’ची अशी प्रेमकहाणी नेहरूंचे सचिव के.एफ. रुस्तम यांची डायरी संपादित होऊन त्याचं पुस्तक प्रकाशित झालं. त्यात नेहरू आणि एडविना यांच्या प्रेमाचा उल्लेख होता. दोघं अभिजात होते. दोघांच्या आवडीनिवडी समान पातळीवर होत्या. नेहरूंवर ब्रिटनचा प्रभाव होता, तर एडविनांवर भारताचा. यात नेहरू आणि इतर महिलांमधल्या अनुरागाबद्दलही लिहिलंय. रुस्तम यांनी लिहिलंय, त्यांचे बऱ्याच महिलांशी जवळचे संबंध होते. या महिला बुद्धिमान होत्या. सरोजनी नायडूंची मुलगी पद्मजा त्यांच्या जवळ होती. पद्मजा यांची विनोदबुद्धी अफाट होती. त्या नेहरूंची खूप काळजी घ्यायच्या. इंडियन समरः द सीक्रेट हिस्ट्री ऑफ एंड ऑफ अॅन एम्पायरचे लेखक अलेक्स वाॅन टेजमननं एका मुलाखतीत म्हटलं होतं, एकदा पद्मजा यांनी रागानं एडविना यांच्या अंगावर फोटोफ्रेम फेकली होती.नंतर दोघींची चांगली मैत्रीही झाली. टेजमन म्हणतात, नेहरूंना बुद्धिमान महिला आवडतात. रुस्तम यांच्या डायरीत प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाईंचाही उल्लेख आहे. पुढे जाऊन त्यांनी वैज्ञानिक होमी जहांगिर भाभांशी लग्न केलं. त्या नेहरूंच्या खूप जवळ होत्या. हे वाचा - Love Story : फिरोज ते मोरारजी…तारकेश्वरींच्या अफेअरचे अनेक किस्से; वाचा त्या कोण होत्या? नेहरूंच्या नंतर सचिव बनलेले एमओ मथाई यांनी रिमिनिसेंस ऑफ नेहरू पुस्तकात बनारसच्या एका महिलेचा उल्लेख केलाय. त्या कदाचित श्रद्धा माता होत्या. पुढे खुशवंत सिंग यांच्या पुस्तकातही हा उल्लेख आहे. टेजमन यांनी हेही म्हटलंय की नेहरू खूप रोमँटिक होते. पण सगळ्यांसाठी नाही. ठराविक जणांसाठीच.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







