जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काल्पनिक नाही, हा मुलगा खरंखुरं जगतो मोगलीसारखं आयुष्य! जंगलात राहून खातो गवत

काल्पनिक नाही, हा मुलगा खरंखुरं जगतो मोगलीसारखं आयुष्य! जंगलात राहून खातो गवत

काल्पनिक नाही, हा मुलगा खरंखुरं जगतो मोगलीसारखं आयुष्य! जंगलात राहून खातो गवत

एलीला बोलता येत नाही. संधी मिळताच तो जंगलात पळून जातो. आईने घरी केलेलं जेवण्यापेक्षा तो अजूनही जंगलात झाडपाला, केळी खाऊन राहणं पसंत करतो. हा आफ्रिकेतला मोगली नक्कीच जगाचं लक्ष वेधून घेत आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    रवांडा, 4 ऑगस्ट: रूडयार्ड किपलिंग यांनी रंगवलेलं मोगली हे पात्र आपल्याला नवं नाही. आपण टीव्हीवर बऱ्याचदा मोगली (Mowgli) पाहिला असेल. मोगली नावाचं कार्टून मालिका जंगल बुकमधलं एक पात्र होतं. मोगली हा माणसाचा लहान मुलगा. त्याचं बालपण जंगलामध्ये प्राण्यांसोबत गेलं असल्यानं त्याचे हावभाव आणि सवयी प्राण्यांसारख्याच झाल्या होत्या. मोगलीला फक्त प्राण्यांची भाषा समजत होती. प्राण्यांसोबत अन्न खाऊन तो जगत असे. लेखक रूडयार्ड किप्लिंग यांनी लिहिलेल्या द जंगल बूक या पुस्तकावरून नंतर कार्टून मालिका आणि चित्रपट तयार झाले. त्यामुळे मोगली हे पात्र लहान मुलांचं प्रिय आहे. परंतु वास्तविक जीवनात सुद्धा काही लोक आहेत. ज्यांना काही कारणास्तव जंगलात राहावं लागतं. त्यामुळे त्यांचे हावभाव प्राण्यांसारखे झालेले असतात. असाच एक एली (Elie) नावाचा मुलगा आहे. आफ्रिकेतील रवांडा गावात राहणाऱ्या एलीला रिअल लाइफ मोगली (Reel Life Mowgli) म्हटलं जातं. गाणं म्हटल्यावर पाऊस पडतो तरी कसा? भारतातील प्रथेचा केंब्रिज विद्यापीठात अभ्यास एलीला बोलता येत नाही. आईच्या हातचं अन्न सुद्धा तो खात नाही. आईने त्याच्यासाठी पदार्थ तयार केले तरीही तो त्याऐवजी गवत खाणचं पसंत करतो. एलीची आई म्हणते की, तिचा एली हा दैवी देणगी आहे. गावातील लोक एली आणि त्याच्या कुटुंबातील लोकांना टोमणे मारतात. तसेच त्रास देतात. त्याचं कारण म्हणजे एलीच्या आईचे पाच गर्भपात (Miscarriage) झाल्यानंतर सहाव्या वेळी एलीचा जन्म झाला. त्यामुळे त्याचं कुटुंब त्याची खूप काळजी घेतं. मात्र एली संधी मिळताच जंगलात निघून जातो. कित्येक दिवसांनी परत येतो. कधीच शाळेत गेला नाही एलीच्या जन्माविषयी, त्याच्या आईने सांगितल्यानुसार, एलीच्या आधी एकापाठोपाठ एक पाच मुलांनंतर एलीचा जन्म झाला आहे. लहानपणापासूनच तो इतर मुलांपासून वेगळा राहत असे. तो कधीच शाळेत गेला नाही. गावात त्याचा कोणी मित्र सुद्धा नाही. तो लोकांपासून दूर जंगलामध्ये पळून जायचा. Shocking! तरुणीचं भलतंच डेअरिंग, चक्क सापालाच केलं किस; Video पाहूनच हादराल Afrimax tv ने Elie वर एक चित्रपट देखील बनवला आहे. एलीच्या आईच्या मते, त्याला अन्न खायला आवडत नाही. त्याला सर्वांत जास्त केळी खायला आवडतात. याशिवाय त्याला काहीही समजत नाही. तसंच त्याला काही करता सुद्धा येत नाही. घरातून जातो पळून एलीला त्याचं घर आवडत नाही. त्याच्या आईचं दुसरीकडे लक्ष जाताच एली घरातून लगेच पळून जंगलात जातो. त्याच्या पाठलाग करत घरातील लोक सुद्धा जंगलापर्यंत जातात. जंगलात तो झाडावर लपून बसतो. घरातील कोणी आलं नाही तर कित्येक दिवस तो जंगलातच राहतो. जंगलामधील जंगली जनावरं त्याच्यावर हल्ला करतात. पण त्याला याची भीती वाटत नाही. असंही म्हटलं जातं की, एली जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टपेक्षा (Usain Bolt) वेगाने धावतो. त्याला पकडण्यासाठी लोकांना खूप मेहनत घ्यावी लागते. खरोखरच अशी एखादी व्यक्ती अस्तित्वात असेल यावर विश्वास बसणार नाही पण ते सत्य आहे. हा आफ्रिकेतला मोगली नक्कीच जगाचं लक्ष वेधून घेत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: africa , forest
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात