वजन वाढल्याने इतर गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळतं. सकाळी उठल्यावर आपण काही चुकीच्या गोष्टी करत असलो तर, त्याने वजनवाढीची समस्या निर्माण होते. हल्दी राहण्यासाठी हेल्दी सवई लावायला हव्यात.
सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोमट प्याणी प्या. कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्यानेही फायदा होतो. रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी पिणंही फायदेशीर आहे.
पॅक्ड ज्युस पिण्याऐवजी फेश ज्युस प्या. पॅक्ड ज्युस प्रोसेस केलेले असतात. त्यात प्रिझर्वेटीव्ह असल्याने याचा शरीराला कोणताही फायदा होण्यापेक्षा नुकसान होते.
गडबडीमुळे नाश्ता न करता घारबाहेर पडण्याची काहींना सवय असते. काहीजण धावपळ करत नाश्ता कतरतात. त्यामुळे मेटाबॉलिजम स्लो होतं. कितीही गडबड असली तरी, थोडा वेळ काढून नाश्ता करा.
काही लोक जास्त खाऊन घराबाहेर पडतात. त्यातही पचायला जड पदार्थ खाल्याने त्यातून कॅलरीज वाढतात. जास्त कॅलरीचं अन्न सकाळी खाल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.
घरामधून नाश्ता करुन न निघाल्याने भूक लागल्यावर काहीजण बाहेरचं अन्न खातात. काही वेळेला जंकफूडही खातात. बाहेर मिळणारे पदार्थ चांगल्या तेलात बनवलेले असतीलच असं नाही.
भूक लागल्यावर बिस्कीटांसारखे पदार्थ खाणंही टाळा. त्यात जास्त प्रमाणात मैद्याचा वापर केलेला असतो. त्यामुळे शक्यतो घरामधून खाऊनच निघा.