नवी दिल्ली, 25 जून : सध्या देशात 18+ नागरिकांचं लसीकरण
(Corona vaccination) केलं जातं आहे. इतर आजार असलेल्या लोकांनी कोरोना लस घ्यायलाच हवी कारण त्यांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका आहे. पण त्याचवेळी ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या आणि प्रेग्नंट महिलांच्या लसीकरणाबाबतही
(Pregnant woman corona vaccination) प्रश्न उपस्थित झाला. ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांच्या लसीकरणाला याआधीच परवानगी देण्यात आली होती. आता प्रेग्नंट महिलांच्या लसीकरणाचा
(Corona vaccination in pregnancy) मार्गही मोकळा झाला आहे.
प्रेग्नंट महिलांनाही कोरोना लस देण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीकरणासंबंधी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार प्रेग्नंट महिलांना कोरोना लस द्याव्यात असं सांगण्यात आलं आहे.
आयसीएमआरचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी सांगितलं की, प्रेग्नंट महिलाही कोरोना लस घेऊ शकता. आरोग्य मंत्रालयाने तशा गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. आयसीएमआरच्या प्रॅगकोविड रजिस्ट्रीमध्येही लसीकरण गर्भवती महिलांसाठी फायदेशीर आहे आणि त्यांना लस द्यायला हवी, असं नमूद करण्यात आलं आहे.
हे वाचा - बस्स! फक्त 10 दिवसांतच...; टेन्शन वाढवणाऱ्या Delta plus बाबत महत्त्वाची अपडेट
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत त्यांनी सांगितलं की लहान मुलांना लस देणारा अमेरिका हा जगातील एकमेव देश आहे. तिथं आम्हाला काही समस्या दिसून आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय अभ्यासातही लहान मुलांना कोरोना लस द्यायची की नाही, याबाबत वादविवाद सुरू आहेत.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आपल्याकडे अद्याप पुरेसा आकडा उपलब्ध होत नाही, तोपर्यंत लहान मुलांचं लसीकरण करण्याच्या स्थितीत आपण नाही. 2-18 वयोगटातील लहान मुलांबाबत संशोधन सुरू केलं आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये याच परिणाम मिळतील. त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ शकू, असं डॉ. भार्गव म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.