जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / भारतातील कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार? रशियाच्या Sputnik Light मुळे आशेचा किरण

भारतातील कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार? रशियाच्या Sputnik Light मुळे आशेचा किरण

भारतातील कोरोना लशीचा तुटवडा दूर होणार? रशियाच्या Sputnik Light मुळे आशेचा किरण

रशियाच्या Sputnik Light कोरोना लशीचा एकच डोस पुरेसा आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मॉस्को, 06 मे : भारतात रशियाच्या स्पुतनिक V (Sputnik V) लशीला आधीच मंजुरी देण्यात आली आहे आता रशियाने (Russia corona vaccine) तयार केलेल्या स्पुतनिक लाइट (Sputnik Light) लशीला रशियाने मंजुरी दिली आहे. या लशीचा फक्त एकच डोस पुरेसा आहे. त्यामुळे स्पुतनिक V  पाठोपाठ जर स्पुतनिक लाइटलाही भारतात मंजुरी मिळाली तर लशीचा तुटव़डा दूर होऊन लसीकरणाला (Corona vaccination) वेग येण्याची शक्यता आहे. रशियाने स्पुतनिक लाइट कोरोना लशीला मंजुरी दिली आहे. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडने (Russian Direct Investment Fund) ही माहिती दिली आहे.

जाहिरात

मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटने ही लस तयार केली आहे. स्पुतनिक V ची ही दुसरी लस आहे आहे. ही लस कोरोनाविरोधात 79.4% प्रभावी आहे. काही लशींच्या दोन डोसपेक्षाही प्रभावी या लशीचा एक डोस आहे, असं रशियाने सांगितलं. या लशीच्या एका डोसशी किंमत 10 डॉलर्स म्हणजे 737 रुपयांपेक्षाही कमी आहे. हे वाचा -  या देशात 12 वर्षांच्या मुलांना मिळणार Corona लस, Pfizer ला मिळाली मान्यता रॉयटर्स च्या वृत्तानुसार RDIF सांगितलं, सिंगल डोस स्पुतनिक लाइटचं 5 डिसेंबर 2020 ते 15 एप्रिल 2021 दरम्यान लसीकरण मोहिमेत ही लस वापरण्यात आली. लस दिल्यानंतर 28 दिवसांनी डेटा तपासण्यात आला. त्यावेळी ही लस 79.4%  प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.  रशिया, यूएई, घाना आणि इतर देशांमध्ये या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेण्यात आलं आहे. यात  7,000 लोकांचा समावेश होता. त्याचा अंतरिम निकाल या महिन्यानंतर येईल. हे वाचा -  …नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत रशियाची सर्वात पहिली लस  Sputnik V  97.6% प्रभावी असल्याचं रशियाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं. या लशीला भारतात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे भारतातील कोरोना लशीचा तुटवडा पाहता सिंगल डोस स्पुतनिक लाइटलाही भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात