ओटावा, 06 मे: कॅनडामध्ये (Canada) लवकरच 12 ते 15 वयोगटातील बालकांनाही कोरोनाची (Coronavirus) लस (vaccine) दिली जाणार आहे. देशात या वयोगटातील बालकांना फायझर (Pfizer) लस देण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे, अशी माहिती तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. 12 वर्षांवरील बालकांच्या लसीकरणासाठी (COVID-19 vaccination) परवानगी देणारा कॅनडा हा जगातील पहिला देश आहे. याआधी 16 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लसीकरणासाठी परवानगी होती. एपीच्या अहवालानुसार, कॅनडाच्या मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. सुप्रिया शर्मा यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या की, लसीकरणानंतर मुलांना पूर्वीसारखं सामान्य जीवन जगता येईल. सध्या अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या वयोगटासाठी ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं पुराव्यांवरून दिसून आलं आहे. कॅनडामध्ये मुलांसाठी मंजूर झालेली ही पहिली लस आहे,असं सुप्रिया शर्मांनी सांगितलं. अमेरिकेतही मान्यता मिळण्याची शक्यता अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन पुढच्या आठवड्यात फायझर (Pfizer) लसीला तरूणांसाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. फायझरची लस ही तरुणांवरही प्रभावी असल्याचं काही आठवड्यांपूर्वी कंपनीला आढळलं होतं, मार्चमध्ये फायझरने 12-15 या वयोगटातील 2260 स्वयंसेवकांवर झालेल्या चाचण्यांचे प्राथमिक निकाल जाहीर केले होते. हे वाचा- बापरे! यावर्षी कोरोनामुळे तब्बल 126 डॉक्टरांचा मृत्यू यामध्ये असं म्हटलं गेलं होतं की कोरोनाची लस दिलेल्या 18 वर्ष वयोगटातील लोकांच्या तुलनेत कमी वयोगटातील स्वयंसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं नाही. सुप्रिया शर्मा म्हणाल्या की कॅनडामध्ये कोरोनाची लागण झालेल्या एकूण लोकसंख्येपैकी एक पंचमांश बाधित मुलं आणि तरुण आहेत. त्यामुळे या वयोगटातील बालकांचे लसीकरण करणं हा कॅनडाच्या लसीकरण मोहिमेचा महत्वाचा भाग आहे.कोरोनामुळे बऱ्याच मुलांना कोणता गंभीर आजार जाणवलेला नाही. मात्र,लसीकरणामुळे ही मुलं त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांसह सुरक्षित राहू शकतील. हे वाचा- …नाहीतर प्राणवायूही ठरेल घातक; केंद्राने सांगितली Oxygen वापराची योग्य पद्धत मुलांवर जाणवले दुष्परिणाम एपीच्या माहितीनुसार,लहान मुलांमध्येही तरुणांप्रमाणे ताप (fever),थंडी वाजणं, थकवा जाणवणं असे दुष्परिणाम जाणवले आहेत. दरम्यान, दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी हा अभ्यास 2 वर्ष सुरू राहील. तसेच गेल्या काही महिन्यात कॅनडामध्ये लसीकरण मोहीमेने (vaccination drive) वेग घेतला आहे. सध्या सगळ्या जगात कोरोना महामारी प्रचंड वाढत आहे. लसीकरण आणि कोरोनापासून बचावासाठीची खबरदारी घेणं हे दोनच उपाय सगळ्यांच्या हातांत आहेत त्यामुळे त्यावर भर देण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.