मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

निरसं दूध खरंच चेहऱ्यावर असा जादूई परिणाम करतं का? जाणून घ्या सत्य

निरसं दूध खरंच चेहऱ्यावर असा जादूई परिणाम करतं का? जाणून घ्या सत्य

त्वचा आणि चेहऱ्याच्या आरोग्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करण्यास सांगितलं जातं. खरंच त्याचे किती आणि कसे फायदे होतात?

त्वचा आणि चेहऱ्याच्या आरोग्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करण्यास सांगितलं जातं. खरंच त्याचे किती आणि कसे फायदे होतात?

त्वचा आणि चेहऱ्याच्या आरोग्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करण्यास सांगितलं जातं. खरंच त्याचे किती आणि कसे फायदे होतात?

दिल्ली, 8 फेब्रुवारी: चेहरा (Face) आकर्षक आणि तजेलदार दिसावा, यासाठी महिला विविध प्रकारची सौंदर्यप्रसाधनं (Cosmetics) वापरतात. तसंच काही महिला आकर्षक चेहऱ्यासाठी वैद्यकीय उपचार, प्लास्टिक सर्जरीसारखे उपायही करतात; मात्र चेहरा, तसंच त्वचा (Skin) तजेलदार आणि आकर्षक दिसण्यासाठी काही घरगुती उपायदेखील (Home Remedies) उपयुक्त ठरतात. अन्य उपयांच्या तुलनेत घरगुती उपचार किफायतशीर असतात आणि घरगुती उपायांमुळे त्वचेवर होणारे दुष्परिणाम टाळता येतात. या घरगुती उपायांमधला प्रमुख उपाय म्हणजे कच्च्या दुधाचा (Raw Milk) वापर होय. Valentine's Day दिवस आधी आकाशात दिसणार विलोभनीय दृश्य; अजिबात चुकवू नका ही संधी दूध हे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच (Health) फायदेशीर असतं असं नव्हे, तर त्वचा आणि विशेषतः चेहऱ्यावरच्या त्वचेसाठीदेखील ते उपयुक्त मानलं जातं. कच्च्या दुधाच्या नियमित वापरामुळे त्वचेवरचे डाग कमी होतात, चेहरा तजेलदार होतो. तसंच त्वचेशी निगडित अन्य समस्याही कमी होतात. याविषयीची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे. कच्चं दूध चेहऱ्यावर लावण्याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे चेहऱ्यावर कच्चं दूध लावण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. त्यामुळे त्वचा आणि चेहऱ्याच्या आरोग्यासाठी कच्च्या दुधाचा वापर घरगुती उपायांपैकी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. कच्चं दूध नियमित चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरचे डाग (Spot) आणि सुरकुत्या (Wrinkles) कमी होतात. चेहऱ्याच्या त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्वचा तजेलदार आणि आकर्षक होते. मखाना, देशी तूप आणि गुळ एकत्र खाण्यामुळं मिळतात कमालीचे फायदे; जाणून घ्या पद्धत मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि चेहरा चमकदार व्हावा, यासाठी किमान एकदा तरी कच्च्या दुधाचा वापर करायला हवा. यामुळे चेहऱ्यावरचा मृत त्वचेचा (Dead Skin) थर निघून जातो. त्वचा नेहमी तजेलदार राहते. चेहऱ्याची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर हा चांगला पर्याय आहे. दुधात बायोटिन, व्हिटॅमिन, लॅक्टिक अॅसिड, मॅग्नेशियम, प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे दूध हे केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर चेहऱ्यावरच्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. दुधातले व्हिटॅमिन ए आणि बी हे घटक अँटीएजिंग (Anti Aging) म्हणून काम करतात. कच्च्या दुधानं चेहऱ्यावर हलका मसाज केल्यास चेहऱ्यावरच्या अकाली वृद्धत्वाची खूण असलेल्या सुरकुत्या निघून जातात. त्यामुळे महिलांनी सौंदर्यवृद्धीसाठी कच्च्या दुधाचा वापर सुरू करणं फायदेशीर आहे. ब्युटी ब्लेंडरचा उपयोग करताना चुकूनही करू नका या चुका; योग्य पद्धत समजून घ्या त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी कच्चं दूध लाभदायक ठरतं. यामुळे त्वचा फ्रेश होते. तसंच नेहमीपेक्षा अधिक तजेलदार दिसू लागते. चेहऱ्यावरची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी महिलांनी कच्च्या दुधाचा वापर तातडीनं सुरू केल्यास काही दिवसांत त्याचे फायदे दिसू लागतात. त्यामुळे सुंदर चेहऱ्यासाठी महिलांनी हा घरगुती उपाय केल्यास त्यांना अपेक्षित परिणाम दिसून येईल.
First published:

Tags: Ayurved, Home remedies

पुढील बातम्या