मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Beauty Blender: ब्युटी ब्लेंडर वापरताना चुकूनही करू नका या चुका; योग्य पद्धत समजून घ्या

Beauty Blender: ब्युटी ब्लेंडर वापरताना चुकूनही करू नका या चुका; योग्य पद्धत समजून घ्या

How To Use Beauty Blender Sponge : ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरल्यानं, मेकअप अधिक चांगल्या प्रकारे त्वचेवर सेट होतो. परंतु, एकदम टॉप मेकअपसाठी, आपण तो योग्यरित्या वापरणं आणि काळजी घेणं देखील आवश्यक आहे. जाणून घेऊया, ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचे फायदे

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी : आजकाल चांगल्या मेकअपसाठी (make up) ब्युटी ब्लेंडर स्पंजचा (Beauty Blender Sponge) खूप वापर केला जातो. मेकअप ब्रशेसपेक्षा ब्युटी ब्लेंडर हे मेकअप करण्यासाठी अधिक आरामदायक आणि सोपं आहे. यामुळं बहुतेक सौंदर्य तज्ज्ञ देखील ब्युटी ब्लेंडर वापरतात. जर तुम्हाला चांगला मेकअप हवा असेल तर, तुम्ही यासाठी ब्युटी ब्लेंडर वापरू शकता. ब्युटी ब्लेंडर स्पंज देखील चेहऱ्यावर फाऊंडेशन सेट (How To Use Beauty Blender Sponge) करण्यासाठी चांगला असतो.

ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरल्यानं, मेकअप अधिक चांगल्या प्रकारे त्वचेवर सेट होतो. परंतु उत्कृष्ट मेकअपसाठी, आपण तो योग्यरित्या वापरणं आणि देखभाल करणं देखील आवश्यक आहे. जाणून घेऊया, ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचे फायदे काय असू शकतात.

फ्लॉलेस मेकअपसाठी ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरण्याच्या टिप्स

मेकअप करताना थेट त्वचेवर आणि स्पंजवर कधीही फाउंडेशन लावू नका. प्रथम तळहातावर फाउंडेशन आणि कन्सीलर लावा. यानंतर स्पंजच्या मदतीनं चेहऱ्यावर फाउंडेशन आणि कन्सीलर लावा. यामुळे फाउंडेशन आणि कन्सीलर चांगले मिसळतील आणि चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे लावता येतील.

अशा प्रकारे अंडाकार ब्युटी ब्लेंडर वापरा

मेकअप सेट करण्यासाठी जर तुम्ही अंड्याच्या आकाराचा ब्युटी ब्लेंडर स्पंज वापरत असाल तर ते तुम्हाला खूप सोयीचं होईल. अंड्याच्या आकाराचा ब्लेंडर वापरल्यानं मेकअप चांगला सेट होतो. स्पंजच्या टोकदार टोकाचा वापर करून डोळ्यांखाली, ओठांच्या जवळ आणि नाकाच्या बाजूला मेकअप ब्लेंड करावा. स्पंजच्या गोलाकार भागानं कपाळ आणि गालांवर मेकअप करा.

हे वाचा - धावपळीत मेकअप करायला वेळ नसतो ना तेव्हा ह्या ब्युटी ट्रीक वापरा; लगेच व्हाल तयार

मेकअप करताना कधी घासून लावू नये

मेकअप करताना हे लक्षात ठेवा की, मेकअप कधीही घासू नये. मेकअप नेहमी स्पंजने हळूहळू थापून लावावा. पॅटिंग करत मेकअप लावल्यानं गुळगुळीत बेस तयार होतो. तसंच, मेकअप त्वचेवर चांगला बसतो. यामुळं घाम आल्यावरही मेकअप खराब होत नाही. स्पंजनं मेकअप लावल्यानं मेकअप बराच काळ चेहऱ्यावर टिकून राहतो.

स्पंज हलकासा ओला करून वापरा

मेकअप करताना स्पंज जास्त ओला नसावा. खूप ओल्या स्पंजनं मेकअप योग्यरित्या सेट होत नाही. निर्दोष मेकअप लूकसाठी, स्पंज ओला करा आणि सर्व पाणी पिळून घ्या. यानंतर स्पंजनं चेहऱ्यावर मेकअप लावा. तसंच, कोरडे स्पंजदेखील वापरू नयेत. कोरडा स्पंज वापरल्यानं मेकअप नीट ब्लेंड होत नाही.

हे वाचा - Winter Skin Care Tips: महागड्या ब्युटी प्रॉडक्टसपेक्षाही जबरदस्त आहेत हे घरगुती स्क्रब; जाणून घ्या बनवण्याची पद्धत

मेक-अप लावल्यानंतर तो स्वच्छ करणंही आवश्यक आहे.

मेकअप केल्यानंतर ब्युटी ब्लेंडर स्पंजनं तो साफ करणंही फार महत्त्वाचं आहे. घाणेरडा स्पंज वापरल्याने त्वचेची अ‌ॅलर्जी आणि मुरुम-पुरळ होऊ शकतात. म्हणून, मेकअप स्वच्छ करताना कोमट पाण्यात फेस वॉश किंवा शॅम्पू घालावा. हे पाणी वापरून स्पंजच्या मदतीनं तुम्ही चेहरा स्वच्छ करू शकता.

First published:
top videos

    Tags: Beauty tips, Face Mask