जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मखाना, देशी तूप आणि गुळ एकत्र खाण्यामुळं मिळतात कमालीचे फायदे; जाणून घ्या सोपी पद्धत

मखाना, देशी तूप आणि गुळ एकत्र खाण्यामुळं मिळतात कमालीचे फायदे; जाणून घ्या सोपी पद्धत

मखाना, देशी तूप आणि गुळ एकत्र खाण्यामुळं मिळतात कमालीचे फायदे; जाणून घ्या सोपी पद्धत

Benefits of Makhana Desi Ghee and Jaggery Mixture: अँटी-ऑक्सिडंट्स, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, कार्ब्स, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन-बी यांसारखे अनेक पोषक घटक मखानामध्ये आढळतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 06 फेब्रुवारी : मखाना (Fox Nut) आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. त्यामुळेच लोक वेगवेगळ्या प्रकारे मखाना आहारात घेत असतात. काहींना दुधात भिजवलेला मखाना खायला आवडतो, तर काहींना कोरडा भाजलेला मखाना आवडतो. काहींना मखानाची खीर खायला आवडते, तर काहींना साखर लावलेला मखाना आवडतो. पण, देशी तूप (Ghee)आणि गुळासोबत (Jaggery) मखाना खाल्ल्‍यास त्‍याचे फायदे अनेक (Benefits of Makhana Desi Ghee and Jaggery Mixture) पटींनी वाढतात. अँटी-ऑक्सिडंट्स, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, कार्ब्स, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन-बी यांसारखे अनेक पोषक घटक मखानामध्ये आढळतात. दुसरीकडे, गुळात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो. तर देशी तुपात कॅल्शियम, फॉस्फरस, खनिजे, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे ए, डी यांसारखी अनेक पोषक तत्वे मुबलक प्रमाणात असतात. या कारणास्तव, या तिघांच्या मिश्रणाचा आरोग्याला एकच नव्हे तर अनेक प्रकारे फायदा होतो. त्याबद्दल जाणून घेऊया. वजन कमी करण्यास उपयुक्त मखाना, तूप आणि गूळ यांचे मिश्रण वजन कमी करण्यास मदत करू शकते. या तिन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने पोट भरले जाते आणि वारंवार भूक लागत नाही. इतकेच नाही तर यामध्ये असलेले पोषक तत्व आपल्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात आणि शरीरात कमजोरी येऊ देत नाहीत. यासोबतच ते चयापचय सुधारण्याचे काम करतात. हे वाचा -  Betel-nut Benefits: सुपारी म्हटलं की फक्त पान-मसाला, गुटखा इतकंच नव्हे; आरोग्यदायी फायदे अनेकांना माहीत नाहीत हाडे मजबूत मखाना, तूप आणि गूळ यांचे मिश्रण हाडे मजबूत करण्याचे काम करतात. या तिन्ही गोष्टींमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे आणि सांध्यातील वेदना कमी होण्यास मदत होते. एवढेच नाही तर स्नायूंच्या विकासातही या मिश्रणाचा खूप फायदा होतो. वृद्धत्वविरोधी आजच्या जीवनशैलीत त्वचेवर अकाली सुरकुत्या दिसू लागतात. मखाना, देशी तूप आणि गुळाचे हे मिश्रण वृद्धत्वविरोधी समस्या कमी करण्यास फायदेशीर आहे. या तिन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो आणि तुमची त्वचा तजेलदार आणि चमकू लागते. हे वाचा -  तुमचं बाळही झोपेतून दचकून, घाबरून जागं होतंय का? याची कारणं आणि उपाय समजून घ्या अशा प्रकारे तयार करा मिश्रण मखाना, देशी तूप आणि गूळ यांचे मिश्रण बनवण्यासाठी प्रथम मखानाचे छोटे तुकडे करा. नंतर एका भांड्यात देशी तूप टाकून त्यात मखाना थोडा वेळ तळून घ्या आणि बाजूला ठेवा. यानंतर एका पातेल्यात गुळाचे बारीक तुकडे करून त्यात 2-3 चमचे पाणी घाला. यानंतर गूळ चांगला वितळला की त्यात भाजलेला मखाना घालून थोडे तूप घालावे. हे मिश्रण काही वेळ मंद आचेवर राहू द्या आणि सतत ढवळत राहा. नंतर एका भांड्यात काढून घ्या आणि हवे तेव्हा खा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात