• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे..! रस्त्यावर दिसलेली ती आकृती भूत आहे की एलियन, धक्कादायक VIDEO व्हायरल

बापरे..! रस्त्यावर दिसलेली ती आकृती भूत आहे की एलियन, धक्कादायक VIDEO व्हायरल

या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक पांढरी आकृती दिसत आहे. हा माणूसच आहे की, वेगळं काही आहे, याबाबत संभ्रम आहे. काहींनी हा एलियन असल्याचे म्हटले आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 जून : भूत, प्रेत, एलियन यावर काही जण विश्वास ठेवतात तर काही जण हा प्रकार निव्वळ वेडेपणा असल्याचं मानतात. आपल्याला दिसणाऱ्या चित्र-विचित्र आकृत्या हा आपल्याच मनाचा खेळ असतो असं काहींचं म्हणणं असतं. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून काहींनी हा काय प्रकार आहे? असा प्रश्न केला, तर काहींनी कोणीतरी गमतीनं असे व्हिडिओ करत असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक पांढरी आकृती दिसत आहे. हा माणूसच आहे की, वेगळं काही आहे, याबाबत संभ्रम आहे. काहींनी हा एलियन असल्याचे म्हटले आहे. एकानं तर हा टिक टॉक व्हिडिओ असल्याचं म्हणून त्याची खिल्ली उडवली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू असताना ही आकृती रस्त्यावरून जाताना काहींना दिसली. गाडीवरून जाणाऱ्या एकानं हा व्हिडिओ बनवल्याचे दिसत आहे. मात्र, या व्हिडिओत स्पष्टपणे ते काय आहे हे दिसून येत नाही. त्यामुळे अनेकांना ते नेमकं काय होतं? याचं उत्तर अद्याप मिळालेले नाही. हा व्हिडिओ पाहून आपण घाबरलो असल्याचं एकाने म्हटलं. दरम्यान, हा व्हिडिओ झारखंडमधील हजारीबाग येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्या लोकेशन विषयी काहीच खात्री देता येत नाही. अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात त्यांचे लोकेशन सहसा समजत नाही. हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: