मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'कधी आईबाबा बनली, कधी भाऊ; मानसकन्येला मुलगा होताच...', ट्रान्सजेंडरने जे केलं ते थक्कं करणारं

'कधी आईबाबा बनली, कधी भाऊ; मानसकन्येला मुलगा होताच...', ट्रान्सजेंडरने जे केलं ते थक्कं करणारं

ट्रान्सजेंडरने मानसलेकीसाठी निभावलं मोठं कर्तव्य

ट्रान्सजेंडरने मानसलेकीसाठी निभावलं मोठं कर्तव्य

स्वतःच्या लेकीप्रमाणे सांभाळलेल्या मानसकन्येला मुलगा होताच ट्रान्सजेंडरने जे केलं, त्याची अपेक्षाही कुणी केली नसेल.

  • Local18
  • Last Updated :
  • Rajasthan, India

kनरेश पारीक/अजमेर, 14 मार्च : कुठे लग्न, बारसं असेल की तृतीयपंथी आवर्जून तिथं जातात. नवदाम्पत्याला, बाळाला नाचत-गात आशीर्वाद देतात आणि त्या कुटुंबाकडून बदल्यात पैशांची किंवा महागड्या वस्तूंची मागणी करतात. पण एक अशी ट्रान्सजेंडर सध्या चर्चेत आली आहे. जिने एका अनाथ मुलीला आपली मुलगी बनवली. या मानसलेकीचं लग्नही लावून दिलं आणि तिला मुलगा होताच तिने जे केलं ते थक्क करणारं आहे.

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील तारानगरमधील सविता या ट्रान्सजेंडरने समाजासमोर एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या एका मुलीला तिने दत्तक घेतलं.  राजपुरा गावातील पिंकी नायकला तिने आपली धर्मपुत्री बनवली.

सुनिताने पिंकीला आपल्या मुलीसारखं वाढवलं. तिला आईबाबा आणि भावाचंही प्रेम दिलं. ती मोठी झाल्यावर तिचं लग्नही लावून दिलं. लग्न झालं म्हणजे आता तिच्याप्रती आपली काहीच जबाबदारी नाही, असं सविताने बिलकुल केलं नाही.  त्या लेकीला आता मुलगा झाला आणि सविताने त्या प्रती असलेलं आपलं कर्तव्यही चोख बजावलं.

रिअल लाइफ बधाई हो! आईबाबांनी दिली Good news, 23 वर्षांच्या लेकीला वाटली लाज, बाळाचा जन्म होताच...

पिंकीला मुलगा झाल्यावर छुछक म्हणून एक प्रथा आहे ती तिने निभावली. छुछक म्हणजे ओटभरणी, राजस्थानच्या या परिसरात ओटभरणीला छुछक म्हटलं जातं. मानसलेकीला मुलगा होताच सुनिताने तिची ओटभरणी केली.  सुनिताने छुछकच्या प्रथेत पिंकीला 35 जोडी कपडे, चादर, भांडी, 5100 रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिनेही दिले.

सुनिता सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असते. कधी कुणाची आई बनते, कधी बाबा, तर कधी भाऊ. गेल्या वर्षी तिने दोन मुलींना दत्तक घेऊन त्यांची भात भरण्याची परंपरा निभावली होती.

सुनिता म्हणाली, "जरी लोक तिला समाजातील मुख्य प्रवाहातील मानत नसतील. पण तरी ती मानवता धर्म निभावण्यावर विश्वास ठेवते. यामुळे तिला समाधान मिळतं". "मला सामान्य व्यक्तीप्रमाणेच समजा. तृतीयपंथी म्हणून समाजापासून वेगळं समजू नका", अशी कळकळीचं आवाहन ती लोकांना करते.

कोणी न्यायाधीश तर, कोणी पोलीस अधिकारी; देशातील या 8 ट्रान्सजेंडर्सनी परिस्थितीला हरवलं

सुनितासारखा ट्रान्सजेंडर तुमच्या पाहण्यातही असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Local18, Positive story, Rajasthan, Transgender, Viral