Home /News /lifestyle /

रुग्ण बोलत राहिला आणि डॉक्टरांनी केलं त्याच्या मेंदूचं ऑपरेशन; गप्पा मारत काढला ब्रेन ट्युमर

रुग्ण बोलत राहिला आणि डॉक्टरांनी केलं त्याच्या मेंदूचं ऑपरेशन; गप्पा मारत काढला ब्रेन ट्युमर

ऑपरेशन किंवा सर्जरी (surgery) म्हटलं की सामान्यपणे रुग्णाला बेशुद्ध केलं जातं.

    जयपूर, 29 ऑक्टोबर : तुम्हाला कसं वाटतं आहे? हातापायांची हालचाल होते आहे का काही त्रास होत नाही ना, सामान्यपणे शस्त्रक्रिया (opretion) झाल्यानंतर शुद्धीवर येताच डॉक्टर असे प्रश्न विचारतात. पण ऑपरेशन (Surgery) करतानाच असे प्रश्न विचारले तर. ऑपरेशन म्हटलं की सामान्यपणे रुग्णाला बेशुद्ध केलं जातं. पण राजस्थानमधल्या डॉक्टरांनी रुग्णाला बेशुद्ध न करताच ऑपरेशन केलं आहे. ऑपरेशन करता करता ते रुग्णाशी बोलत होते, रुग्णही त्यांच्याशी बोलत होता. जयपूरच्या भगवान महावीर कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये एका CISF जवानावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जवानाचं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं. त्याच्यावर अवेक सर्जरी करण्यात आली. म्हणजे हा रुग्ण हा रुग्ण सर्जरीवेळी फक्त शुद्धीवर नव्हता तर हातापायांची हालचाल करत होता आणि डॉक्टरांशी बोलतही होता. अशा स्थितीतच डॉक्टरांनी त्याच्या मेंदूतील ट्युमर काढला. जवळपास दोन महिन्यांपूर्वी जवानाने डॉक्टरांना आपल्या हाताची हालचाल होत नसल्याचं सांगितलं. त्यानंतर तपासणीत त्याच्या मेंदूत ब्रेन ट्युमर असल्याचं समजलं आणि मग डॉक्टारंनी अवेक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. हे वाचा - कोरोना मेंदूवर करतोय हल्ला; बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये असा दिसून आला दुष्परिणाम रुग्णालयातील न्यूरो ऑन्को सर्जन डॉ. नितीन द्विवेदी यांनी सांगतिलं, "जवानाच्या हातांमध्ये कमजोरी होती. तपासणीत त्याच्या मेंदूत ब्रेन ट्युमर असल्याचं समजलं. हा ट्युमर मेंदूत अशा ठिकाणी होता, जिथं हात आणि चेहऱ्याचं नियंत्रण होतं. अशा परिस्थितीत जर सामान्य म्हणजे रुग्णाला बेशुद्ध करून सर्जरी केली असत तर त्याच्या चेहऱ्यावर कमजोरी किंवा लकवा मारण्याची शक्यता जास्त होती. CISF च्या एका जवानावर अवेक सर्जरी करण्यात आली" हे वाचा - सांध्यांतील वेदनांकडे वेळीच द्या लक्ष नाहीतर बेतू शकतं जीवावर "रुग्ण शुद्धीवर असताना ऑपरेशन करण्याचा फायदा म्हणजे ट्युमर काढताना जर शरीरातील कोणत्या भागावर कमजोरी आल्यासारखं वाटलं तर लगेच ती परिस्थिती हाताळता येते. रुग्णाला लकवा येऊ नये यासाठी या पद्धतीचा वापर केला जाचो. सर्जरीदरम्यान रुग्णाची स्थिती समजावी यासाठी त्याला बोलण्यास, हातापायांची आणि डोळ्यांची हालचाल करण्यास सांगण्यात आलं", असं डॉ. द्विवेदी म्हणाले.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Operation, Rajasthan, Surgery

    पुढील बातम्या