Home /News /lifestyle /

सांध्यांतील वेदनांकडे वेळीच द्या लक्ष नाहीतर बेतू शकतं जीवावर

सांध्यांतील वेदनांकडे वेळीच द्या लक्ष नाहीतर बेतू शकतं जीवावर

सध्या कोरोना लॉकडाऊनमध्ये बहुतेक लोकांच्या सांध्यांची दुखणी (joint pain) वाढली आहेत, सर्वसामान्य म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका, तर त्यामागील कारणाचं वेळीच निदान करून त्यावर उपचार घ्या.

    मुंबई, 29 ऑक्टोबर :  नियमित सांधेदुखीमुळे (joint pain) दैनंदिन काम करणं तुम्हाला अवघड जातं आहे का? शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत का? सांध्यात तीव्र वेदना जाणवत आहेत का? या सांधेदुखीवर वेळीच निदान आणि उपचार न केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सांध्याशी संबंधित दुखणं जाणवत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही परिस्थिती भविष्यात अतिशय त्रासदायक ठरू शकते आणि त्याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. आपल्या शरीरात खांदे, कोपर, मनगट, कमरेचे खुबे आणि गुडघे इथं हाडांचे प्रमुख सांधे असतात. या सांध्यांमुळे चालणं, उठणं आणि बसणं अशक्य होते. पण एक सांधा जरी कमकुवत झाला तरी आपल्या शरीराची हालचाल कमी होऊ लागते. मुंबईतील वोक्हार्ट रुग्णालयातील ऑर्थोपेडिक अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. मुदीत खन्ना यांनी सांगितलं, सांधे दुखणं हे प्रमुख लक्षण असलेल्या अनेक विकारांच्या समूहासाठी संधिवात ही संज्ञा सामान्यत: वापरली जाते. संधिवात म्हणजे सूज, लालसरपणा, कडकपणा अशी चिन्हं दिसून येतात. संधिवात ही एक आनुवंशिक समस्या आहे. यामध्ये शरीर स्वतःच्याच निरोगी पेशींवर हल्ला चढवतं. परिणामी सांध्यांवर सूज येऊ लागते. संधिवाताचे अनेक भिन्न प्रकार आहेत. या सर्व आजारांची वेगवेगळी कारणं, वैशिष्ट्यं, लक्षणं आणि उपचार आहेत. पण या सर्व परिस्थितींमध्ये समान आहे ते म्हणजे सांध्याचं दुखणं. या सांधेदुखीमुळे व्यक्तीच्या शरीरातील अन्य भागांवरही विपरित परिणाम होऊ शकतो. वाढत्या वयामुळे संधिवाताचा त्रास होतो. मात्र हा त्रास प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळा असू शकतो. काही जणांना सांध्यात अतिशय वेदना जाणवू शकते. तर काहींना फारस दुखणं जाणवणार नाही. आनुवंशिक घटक, संसर्ग, स्नायूची दुखापत आणि हाडांना फ्रॅक्चर झाल्यास संधिवाताचा त्रास होऊ शकतो. जर सांधेदुखीचा त्रास आपल्या दैनंदिन कामात अडथळा आणत असेल किंवा एका आठवड्यापर्यंत दुखणं कायम राहिल्यास तातडीने डॉक्टरांना सल्ला घ्या. कारण संधिवात हा आजीवन राहतो तो बरा होऊ शकत नाही. हे वाचा - लघवी करताना जळजळ, वेदना; घरगुती उपचारांनी मिळवा आराम तुम्हाला सांधेदुखी, सूज येणं आणि सांधे कडक होणं यासारखी लक्षणं दिसल्यास उपचारांना उशीर करणं घातक ठरू शकतं. सांधेदुखीकडे दुर्लक्ष केल्यास दुखणं वाढून सांधा निकामी होऊ शकतो. जर वेळीच उपचार झाले नाहीत तर मृत्यूही ओढावू शकतो.  त्यामुळे सांध्याचं दुखणं अंगावर न काढता त्वरीत औषधोपचार सुरू करा. जेणेकरून सांध्याचं होणारं कायमस्वरूपी नुकसान टाळता येऊ शकते, असं डॉ. मुदीत खन्ना यांनी सांगितलं. संधिवात नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णाला औषध किंवा स्टेरॉइड्स दिले जातात. प्रत्येक व्यक्तीच्या आजारानुसार या औषधांमध्ये बदल केला जातात. सांध्यातील वेदना किंवा शरीरातील ताठरपणा कमी करण्यासाठी काही रुग्णांना फिजिओथेरपी किंवा काही विशिष्ट व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. संधिवातावर उपचार होत नसल्यास शेवटचा पर्याय म्हणून शस्त्रक्रिया केली जाते. काही रुग्णांचे सांधे निकामी झाल्यास प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय नसतो. यासाठी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची निवड करावी की नाही, हे डॉक्टर ठरवतात. मुळात हे रुग्णाच्या आजारावरून ठरवलं जातं. हे वाचा - सावधान ! कोल्डड्रिंक पिण्याची सवय जीवावर बेतू शकते; धक्कादायक माहिती उघड सांध्यातील वेदना कमी करण्यासाठी उष्णता किंवा कोल्ड थेरपीची निवड करा. यामुळे आपल्या स्नायूंना आरास मिळतो आणि कोल्ड थेरपीमुळे जळजळ कमी होऊ शकते. संधिवाताने पीडित असणाऱ्यांसाठी योग किंवा ध्यान करणं फायदेशीर ठरू शकतं. याशिवा संतुलित आहार घ्यावा, तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Pain

    पुढील बातम्या