जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नशीबवान लोकांच्या हातावर असते अशी राहु रेषा! प्रचंड धन-दौलत-नाव कमावतात ही माणसं

नशीबवान लोकांच्या हातावर असते अशी राहु रेषा! प्रचंड धन-दौलत-नाव कमावतात ही माणसं

नशीबवान लोकांच्या हातावर असते अशी राहु रेषा! प्रचंड धन-दौलत-नाव कमावतात ही माणसं

तळहातातील एखादी रेषा मंगळाच्या क्षेत्रातून निघून जीवनरेषा आणि भाग्यरेषा ओलांडल्यानंतर मेंदू रेषेला स्पर्श करते किंवा ती ओलांडून हृदय रेषेकडे जाते तिला राहू रेषा म्हणतात. तळहातावर एकापेक्षा जास्त राहू रेषा असू शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 08 एप्रिल : ज्योतिषशास्त्रात (Astrology) ज्याप्रमाणे व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या आधारे भविष्यातील गोष्टींचा अंदाज व्यक्त केला जातो, त्याचप्रमाणे हस्तरेषाशास्त्रात (Palmistry) व्यक्तीच्या हाताच्या रेषा, चिन्हे, आकार यांचे विश्लेषण करून भविष्य कळते. हस्तरेषाशास्त्रात काही रेषा महत्त्वाच्या मानल्या जातात. उदा. जीवनरेषा, भाग्यरेषा, धनरेषा, विवाह रेषा, राहू रेषा इ. आज आपण राहू रेखाबद्दल बोलत आहोत. ज्याप्रमाणे कुंडलीतील राहूची विस्कळीत स्थिती जीवनात संकटं आणू शकते, त्याचप्रमाणे हातातील राहूच्या स्थितीवरून भविष्यातील घडामोडी कळू (Palmistry Tips) शकतात. राहू रेषा बदलते भाग्य - - झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, तळहातातील एखादी रेषा मंगळाच्या क्षेत्रातून निघून जीवनरेषा आणि भाग्यरेषा ओलांडल्यानंतर मेंदू रेषेला स्पर्श करते किंवा ती ओलांडून हृदय रेषेकडे जाते तिला राहू रेषा म्हणतात. तळहातावर एकापेक्षा जास्त राहू रेषा असू शकतात. या रेषा तळहाताच्या मध्यभागी असतात. - ज्या लोकांच्या हातात स्पष्ट राहु रेषा असते आणि त्याच्या वर दुसरी कोणतीही रेषा नसते, अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप मान-सन्मान मिळतो. या लोकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही क्षेत्रात सन्मान मिळतो. या लोकांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचे पुरस्कार मिळण्याचीही दाट शक्यता असते. - तसेच एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त राहू रेषा असतील आणि त्या तुटल्या नसतील तर अशा व्यक्तीला उच्च प्रशासकीय पद प्राप्त होतं. त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप आनंद आणि यश मिळतं. हे वाचा -  गोड, रसाळ असलं तरी उन्हाळ्यात हे फळ भरपूर खा; वजन राहील नियंत्रणात - ज्या लोकांच्या हातातील मेंदूची रेषा किंवा तिची कोणतीही शाखा बुध पर्वतावर जाते आणि तेथे बेट तयार होते, त्यांच्यासाठी हे खूप शुभ मानलं जातं. अशा लोकांचे भाग्य राजकारणात उजळते. त्यांना मोठे पद मिळते. हे वाचा -  तुमच्या जन्मतारखेनुसार करा हे दान, अंकशास्त्रानुसार समजून घ्या आजचा दिवस (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि हस्तशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात