नागपूर, 29 मार्च : तुम्ही सोशल मीडियावर (Social media) असाल आणि तिथं व्हायरल व्हिडीओ (Viral video) पाहत असाल तर सलूनमध्ये गोंधळ घालणारा तो छोटासा, क्युट, गुबगुबीत मुलगा तर तुम्हाला माहितीच झाला असेल. हो बरोबर तोच मुलगा. नागपूरचा (Nagpur) अनुश्रूत (Anushrut). सलूननंतर (Anushrut haircut video) आता त्याने डेंटल क्लिनिकमध्येही (Anushrut dental clinic video) गोंधळ घातला. अनुश्रूतचा डेंटल क्लिनिकमधील नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
छोटासा, निरागस पण खोडकर आणि बोल बच्चन असलेला अनुश्रूत पोहोचला तो डेंटल क्लिनिकमध्ये. सलूनमध्ये न्हाव्याला धमकी देणाऱ्या अनुश्रूतने तर डॉक्टरांनाही सोडलं नाही. डेंटल क्लिनिकमध्ये गेल्यावर तिथं त्याने डेंटिस्टनाही धमकी दिली आहे.
My Kid Anushrut Funny Moments In Dental Clinic link- https://t.co/6J1uI4V3t8 Youtube link - https://t.co/OesXluuLDR Facebook link- https://t.co/fUxAX9msS2 Twitter Link - https://t.co/zNBhMusXx0 Instagram link-https://t.co/EqS9n6OApW@viralbhayani @RichaChadha pic.twitter.com/e2tF6nj34F
— Anup Jiwan Petkar (@Anup20992699) March 21, 2021
अनुश्रूतच्या वडिलांनी त्यांच्या ट्विटवर अनुश्रूतचा डेंटल क्लिनिकमधील व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता अनुश्रूत एका सीटवर बसला आहे. डेंटिस्ट त्याच्याशी बोलत आहे. तुम्ही काय करत आहात, डेंटिस्टकडे आळा आहात, असं डॉक्टर म्हणतात अनुश्रूत त्यांना लगेच उत्तर देतो. हो.. माझे दात काढू नका, अशी धमकीच तो डॉक्टरांना देतो. त्यावर डॉक्टरदेखील अजिबात दात काढणार नाही, असं मजेशीर उत्तर त्याला देतात.
हे वाचा - भूतानची ही स्मार्ट चिमुरडी भारताला म्हणाली 'शुक्रिया', व्हायरल झाला निरागस VIDEO
यानंतर अनुश्रूत आणि डॉक्टरांच्या चांगल्याच गप्पा रंगलेल्या दिसतात. डॉक्टर त्याला खुर्चीसोबत मस्त जादूही करून दाखवतात. जे पाहून निरागस अनुश्रूतला आश्चर्यच वाटतं. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्ट दिसतात. अगदी बिनधास्तपणे बोलणारा अनुश्रूत डॉक्टर जेव्हा त्याच्या दातांची प्रक्रिया करण्यासाठी त्याला तयार करतात तेव्हा मात्र तो थोडा घाबरलेलाही दिसतो. ही भीतीसुद्धा त्याच्या गोंडस चेहऱ्यावर झळकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Funny video, Viral, Viral videos