मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Pumpkin Seed Day : वेट लॉस ते फर्टिलिटीच्या समस्यांवरही फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बिया, असा करा वापर

Pumpkin Seed Day : वेट लॉस ते फर्टिलिटीच्या समस्यांवरही फायदेशीर आहेत भोपळ्याच्या बिया, असा करा वापर

भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक रोगांशी लढण्याची क्षमता असते. भोपळ्याच्या बियांमध्ये जस्त, फॉस्फरस, मॅंगनीज, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक रोगांशी लढण्याची क्षमता असते. भोपळ्याच्या बियांमध्ये जस्त, फॉस्फरस, मॅंगनीज, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

भोपळ्याच्या बियांमध्ये अनेक रोगांशी लढण्याची क्षमता असते. भोपळ्याच्या बियांमध्ये जस्त, फॉस्फरस, मॅंगनीज, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 5 ऑक्टोबर : भोपळा खायला बऱ्याच जणांना आवडतो. मात्र त्याच्या बिया सहसा कुणी वापरात नाही. पण भोपळ्याच्या बियांमध्ये इतके गुणधर्म आहेत की ते आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतात. भोपळ्याच्या बियाच्या फायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या बुधवारी पम्पकिन सीड्स डे साजरा केला जातो. यानिमित्त आज आपण भोपळ्याच्या फायद्यांविषयी माहिती घेणार आहोत.

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असते म्हणजेच ते शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवते. भोपळ्यामधे सेलेनियम आणि बीटा-कॅरोटीनसारखे अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आढळतात. तसेच या बिया लोहाचादेखील उत्तम स्रोत आहेत. एक कप भोपळ्याच्या बियांमध्ये 9.52 मिलीग्राम लोह असते. प्रौढ स्त्रियांना 18 मिलीग्राम आणि पुरुषामध्ये 8 मिलीग्राम लोह आवश्यक असते.

जेवणात करा शेंगदाणा तेलाचा समावेश; 'हे' होतील फायदे

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, फॉस्फरस, मॅंगनीज, प्रोटीन आणि फायबर पुरेशा प्रमाणात आढळतात. भोपळ्याच्या बियांमध्ये वजन कमी करण्यापासून ते प्रजनन क्षमता वाढवण्यापर्यंतचे गुणधर्म असतात. यामुळे पचनक्रिया चांगली राहते, त्यामुळे अनेकदा भूक लागत नाही.

भोपळ्याच्या बियांचे फायदे

वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय

भोपळ्याच्या एका बीमध्ये 1.8 ग्रॅम फायबर असते. फायबर हे पोटासाठी अतिशय उपयुक्त कंपाऊंड आहे. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. भोपळ्याच्या बिया खाल्यास वारंवार भूक लागत नाही. यामुळेच वजन कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भोपळ्याच्या बिया खूप उपयुक्त ठरतात.

प्रजनन क्षमता आणि मूत्र आरोग्य

पारंपारिकपणे भोपळ्याच्या बिया कामोत्तेजक म्हणून वापरल्या जातात. खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक देखील भरपूर असते, ज्यामुळे पुरुषांच्या प्रजननक्षमतेला फायदा होऊ शकतो. 2018 च्या अभ्यासानुसार, ते शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही सुधारू शकते.

2019 च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, प्रोस्टेटिक हायपरप्लासिया असलेल्या रुग्णांसाठी भोपळ्याच्या बियांचा अर्क उपयुक्त आहे. हा एक आजार आहे ज्यामुळे प्रोस्टेट मोठा होतो आणि लघवीला त्रास होतो.

झोपेसाठी फायदेशीर

भोपळ्याच्या बियांमध्ये अमीनो अॅसिड ट्रायप्टोफॅन भरपूर प्रमाणात असते. जर तुम्ही झोप न लागण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर झोपण्यापूर्वी भोपळ्याच्या बियांचे सेवन करा. तुम्हाला दर्जेदार झोप मिळेल. भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे रसायन असते, ज्याचे शरीर सेरोटोनिनमध्ये रूपांतर करते.

सेरोटोनिन हा फील-गुड हार्मोन आहे. ज्यामुळे शरीराला बरे वाटते. यामुळे मेलाटोनिन हा हार्मोन सोडला जातो जो झोपेचा हार्मोन आहे. त्यामुळे चांगली झोप लागते. संशोधनानुसार, झोपण्यापूर्वी 1 ग्रॅम किंवा त्याहून अधिक ट्रिप्टोफॅनचे सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.

मधुमेहाच्या रुग्णांनी मध खाल्ला तर चालेल का? कसा होतो हेल्थवर परिणाम

भोपळ्याच्या बिया कशा वापरायच्या

भोपळ्याच्या बिया भाजून वापरता येतात. या सॅलडमध्ये टाकता येतात, भाज्यांच्या ग्रेव्हीला घट्ट बनवण्यासाठी वापरता येतात. याशिवाय सुक्या मेव्याच्या मिश्रणात किंवा गोड पदार्थांमध्येही टाकून खाता येतात.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Superfood, Weight loss tips