मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

इथं महिला नाही तर चक्क पुरुष सांभाळतात चूल; दिलं जातं स्पेशल ट्रेनिंग

इथं महिला नाही तर चक्क पुरुष सांभाळतात चूल; दिलं जातं स्पेशल ट्रेनिंग

या गावाला स्वयंपाकी पुरुषांचं गाव (Village of Cooks) म्हणूनच ओळखलं जातं.

या गावाला स्वयंपाकी पुरुषांचं गाव (Village of Cooks) म्हणूनच ओळखलं जातं.

या गावाला स्वयंपाकी पुरुषांचं गाव (Village of Cooks) म्हणूनच ओळखलं जातं.

पुदुचेरी, 23 जून : स्वयंपाकघर म्हटलं की तिथं फक्त महिलांचं काम. चूल आणि मूल हे महिलांसाठी ठरलेलं वाक्य असायचं. पण आता परिस्थिती बदलेली आहे. बहुतेक पुरुषही स्वयंपाकघरात (Man cook food) काम करताना दिसतात. पण महिलांसारखं पूर्ण दिवस स्वयंपाकघर अजूनही सांभाळात नाही. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, 500 वर्षांपासून घरातलं स्वयंपाकघर पुरूष (Man in kitchen) सांभाळत आहेत.

पुदुचेरी (Puducherry) या केंद्रशासित प्रदेशात कलायुर (Kalayur Village) नावाचं गाव आहे त्याला स्वयंपाकी पुरुषांचं गाव (Village of Cooks) म्हणूनच ओळखलं जातं. पुदुच्चेरीपासून  30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावामध्ये 80 घरं आहेत या प्रत्येक घरात तुम्हाला एक उत्तम शेफ भेटेल. हे शेफ इतके तयार आहे की त्यांच्या हातचे पदार्थ खाल्ले तर तुम्ही थक्क होऊन जाल.

हे वाचा - Explainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय?

रिपोर्टनुसार  या गावातले पुरुष घरात वडिलांच्या हाताखाली स्वयंपाक शिकत नाहीत तर गावातील मुख्य शेफ (Chief Chef) त्यांना जवळजवळ 10 वर्षे स्वयंपाक कसा करायचा याचं ट्रेनिंग देतो. दक्षिण भारतीय सगळ्या रेसिपींचं ट्रेनिंग हा शेफ आपल्या गावातल्या कूकना देतो. या गावात 200 कूक आहेत. त्या परिसरातील लग्न, इतर समारंभ आणि पार्ट्यांमध्ये हे कूकच जेवळ तयार करतात. हे सगळे मिळून एकावेळी 1 हजार माणसांसाठी जेवण तयार करू शकतात.

आधीच्या काळात शेतीची कामं करणं कठीण होतं त्यामुळे या गावातील पुरुषांनी स्वत: हून शेतीचं काम स्वीकारलं. त्या काळात नोकऱ्याही फारशा नव्हत्या. त्यामुळे पुरुषांनी स्वयंपाकी होण्याचा निर्णय घेतला आणि त्याचाच ते व्यवसायही करतात. त्यामुळे त्यांना उदरनिर्वाहाचं साधनही मिळालं.

हे वाचा - पालकांनो अभ्यासासोबतच मुलांना शिकवा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; नक्की होतील यशस्वी

सध्या शहरात पुरुषांना महिलांच्या कामाबदद्ल आदर आहे. महिलाही वेगवेगळ्या क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर कामं करतात त्यामुळे घरातील कामं दोघांनी मिळून करायची हे दोघांना माहीत असतं. त्यामुळे सामान भरण्यापासून ते रविवारच्या साफसफाईपर्यंत पुरूष घरातली सगळी कामं करतात. एखाद्या रविवारी बायकोला आराम मिळावा म्हणून ते एखादी रेसिपी तयार करतात. पण संपूर्ण किचनचा भार स्वीकारलेले पुरूष अगदीच कमी. त्यामुळे या गावाकडून आदर्श घेता येऊ शकतो.

First published:

Tags: Chef, Food