Explainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय? असा होणार पर्यटन क्षेत्राला फायदा

Explainer: जगभरात ट्रेंडिंग असलेलं हे 'व्हॅक्सिन टुरिझम' म्हणजे आहे तरी काय? असा होणार पर्यटन क्षेत्राला फायदा

व्हॅक्सिन टुरिझम हा एक नवा प्रकार पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देऊ शकतो

  • Share this:

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून जग हळूहळू बाहेर येत आहे; पण वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या उद्योगांवर या कोरोनामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बरेच परिणाम झाले आहेत. फिरण्यावर निर्बंध ही यातली मूलभूत गोष्ट असल्यामुळे पर्यटन, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. जगभरातली सरकारं अर्थव्यवस्थेत पुन्हा जीव फुंकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी काहीउपक्रम ठरवून त्या क्षेत्रांना प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यात सुरक्षित पर्यटन ही काळाची गरज आहे. वेगाने लसीकरण पूर्ण करणं हा पर्यटन क्षेत्र पूर्णपणे खुलं करण्याचा एकमेव महत्त्वाचा मार्ग आहे. त्यात व्हॅक्सिन टुरिझम (Vaccine Tourism) हा एक नवा प्रकार पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देऊ शकतो.

जगभरातले देश लसीकरणावर भर देत आहेत. त्यातच व्हॅक्सिन टुरिझम (Vaccine Tourism) हा एक नवा ट्रेंड जगभर रुजू लागल्याचं दिसत आहे. काही मोजक्या देशांकडे लसीकरण वेगाने पार पाडण्यासाठी लशींचा पुरेसा साठा आहे. काही देशांकडे मात्र मर्यादित लससाठा असल्याने ते देश टप्प्याटप्प्याने लसीकरण मोहिमा राबवत आहेत.

थायलंड, भारत (India), व्हिएतनाम, तैवान आदी देशांमध्ये लशींचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स (HNIs) आणि अल्ट्रा-हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स (UHNIs) म्हणजेच अतिश्रीमंत व्यक्ती आपलं बस्तान अधिक विकसित देशांत हलवत आहेत, जेणेकरून लस, तसंच अन्य आरोग्यविषयक सोयी-सुविधा चांगल्या प्रकारे मिळू शकतील.

हे वाचा -  शिवराय, बाळासाहेब की दि. बा.? दोघांच्या वादात आता मनसेचीही उडी

ग्लोबल सिटिझन्ससाठी टेलर्ड पॅकेजेस

भारतातल्या, तसंच अन्य काही देशांतल्या ट्रॅव्हल कंपन्या व्हॅक्सिनेशन विथ व्हेकेशन (Vaccination with vacation) म्हणजेच सुट्ट्यांसोबत लसीकरण अशी आकर्षक डील्स (Lucrative Deals) देत आहेत. काही देश तर पर्यटकांसाठी टेलर्ड पॅकेजेसही (Tailored Packages) देत आहेत. लंडनमधल्या एक्स्क्लुझिव्ह ट्रॅव्हल अँड लाइफस्टाइल कंपनीने (Travel and Lifestyle Company) त्यांच्या सदस्यांसाठी 25 हजार डॉलर्सचं पॅकेज देऊ केलं आहे. पॅकेजची घोषणा केल्यावर त्यांच्याकडे 2000 हून अधिक अर्ज आले.

न्यूयॉर्कमध्ये अमर्यादित (New York) आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी न्यूयॉर्कमधली एक वैद्यकीय संस्था प्रचंड महागडं वार्षिक पॅकेज देते. त्या संस्थेकडे अनेक श्रीमंत पेशंट्सनी संपर्क साधल्याची माहितीही मिळत आहे. जर्मनीत ज्या ठिकाणी स्थानिक नागरिकांचं पुरेशा प्रमाणात लसीकरण झालं आहे, अशा ठिकाणी व्हॅक्सिन व्हेकेशन्स म्हणून जाहिरात करायला काही जर्मन ट्रॅव्हल एजन्सीजनी सुरुवात केली आहे.

नॉर्वेतल्या ट्रॅव्हल एजन्सीजही (Travel Agencies) अशा प्रकारच्या सेवा जर्मनी, रशियासारख्या देशांत जाण्यासाठी पुरवत आहेत.  रशियात जाणाऱ्या पर्यटकांना स्पुटनिक व्ही (Sputnik V) ही लसदेखील देण्याची सोय उपलब्ध करून जाते. हिंदी महासागरातला बेट स्वरूपाचा देश असलेल्या मालदीवमध्येही समुद्रकिनाऱ्यावर लसीकरण करण्याचं पॅकेज दिलं जात आहे. अशा प्रकारे व्हॅक्सिन टुरिझम ही अचानकपणे समोर आलेली संधी अनेक यंत्रणांनी आपल्या नफ्यासाठी वापरून घेतली आणि अनेक जणांनी त्याचा लाभही घेतला.

ब्रिटनमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. त्यामुळे प्रवासावरची बंधनं थोडी शिथिल केली जात आहेत. रेड लिस्ट कॅटेगरीतून (Red List Category) येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तयार केलेलं क्वारंटाइन पॅकेज (Quarantine Package) खरेदी करावं लागतं. क्वारंटाइन पॅकेज घेणाऱ्या प्रवाशांसाठी ब्रिटन सरकारने 16 हॉटेल्समधल्या 4600 खोल्या निश्चित केल्या आहेत. अनेक देश अशाच प्रकारचं टूर पॅकेज देत असून, त्यात काही भागांच्या सहलीचा समावेश असतो. त्याला इम्युन व्हेकेशन एक्स्पीरिअन्स (Immune Vacation Experience) असं म्हटलं जातं.

हे वाचा -Explainer: विवाह नोंदणी करणं का आवश्यक? Marriage Certificate बद्दल जाणून घ्या

कोविड-19 व्हॅक्सिन टुरिझम हे हेल्थ किंवा मेडिकल टुरिझम (Medical Tourism) अर्थात वैद्यकीय पर्यटन आहे. त्यामुळे सध्याच्या वैद्यकीय पर्यटनाची अनेक वैशिष्ट्यं त्यात आहेत. मागणी जास्त आणि उपलब्धता कमी हेच मार्केट डायनॅमिक्स त्याला लागू पडतं. त्यामुळे जी लोकं त्यासाठी अक्षरशः तडफडत असतात, ती वाट्टेल त्या किमतीला ते घेतात. प्राणघातक विषाणूपासून सुरक्षिततेची ग्वाही आणि निर्बंधमुक्त प्रवास या तत्त्वांवर हे मेडिकल टुरिझम आधारलेलं आहे.

अनेक क्लिनिकल ट्रायल्सच्या निष्कर्षांनुसार लशींमुळे कोरोनाशी लढण्याची मोठी प्रतिकारशक्ती तयार होते. अनेक देश विद्यार्थी आणि पर्यटकांना लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवूनच प्रवेश देत आहेत. परदेश प्रवासासाठी पासपोर्टइतकंच महत्त्व आता व्हॅक्सिन सर्टिफिकेटला आलं आहे. जीव वाचवणं महत्त्वाचं आहेच, पण उपजीविका टिकवणंही महत्त्वाचं आहे. सगळं पूर्वपदावर कधी येईल, याची कोणालाच कल्पना नाही; पण तोपर्यंत प्रतिबंधात्मक काळजी घेऊन प्रवास करणं एवढंच आपल्या हाती आहे असं दिल्लॉन भट्ट यांनी म्हंटलं आहे.

Published by: Atharva Mahankal
First published: June 22, 2021, 6:57 PM IST

ताज्या बातम्या