जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Stretch Marks Removal : खूप प्रयत्न करूनही स्ट्रेच मार्क्स जात नाहीत? उत्तम प्रभावासाठी असे वापरा मोहरीचे तेल

Stretch Marks Removal : खूप प्रयत्न करूनही स्ट्रेच मार्क्स जात नाहीत? उत्तम प्रभावासाठी असे वापरा मोहरीचे तेल

Stretch Marks Removal : खूप प्रयत्न करूनही स्ट्रेच मार्क्स जात नाहीत? उत्तम प्रभावासाठी असे वापरा मोहरीचे तेल

साधारणपणे स्ट्रेच मार्क्स काढणे खूप कठीण काम असते. अनेक स्किन केअर प्रोडक्ट्स वापरूनही स्ट्रेच मार्क्स जात नाहीत. अशा परिस्थितीत मोहरीच्या तेलाचा वापर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 फेब्रुवारी : बर्‍याच वेळा स्किन केअरचे खास रूटीन पाळले तरी त्वचेच्या काही समस्या दूर होण्याचे नाव घेत नाहीत. स्ट्रेच मार्क्सची समस्या देखील त्यापैकीच एक आहे. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी लोक अनेक मार्ग वापरतात. पण जर काही प्रमाणात स्ट्रेच मार्क्स कमी होत नसतील तर काही खास पद्धतीने मोहरीच्या तेलाचा वापर करून तुम्ही स्ट्रेच मार्क्सपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकता. वजन कमी झाल्यानंतर आणि विशेषत: गरोदरपणानंतर महिलांच्या ओटीपोटावर स्ट्रेच मार्क्सची समस्या सामान्यपणे दिसून येते. अशा परिस्थितीत केवळ स्ट्रेच मार्क्स लपविणे कठीण होत नाही. उलट अनेक युक्त्या अवलंबल्यानंतरही स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे नाहीसे होत नाहीत. तथापि, मोहरीच्या तेलाच्या मदतीने, आपण स्ट्रेच मार्क्स सहजपणे घालवू शकता. चला तर मग जाणून घेऊया मोहरीच्या तेलाचा वापर आणि स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी त्याचे फायदे.

Breast Cancer Awareness Month 2022 : ही 7 लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टर गाठा; असू शकतो ब्रेस्ट कॅन्सर

मोहरीचे तेल कसे वापरावे स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी प्रथम एका भांड्यात थोडे मोहरीचे तेल घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑईलही मिक्स करू शकता. यामुळे तुमचे स्ट्रेच मार्क्स लवकरच गायब होतील. आता तेल हलके गरम करून स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी या या उपायाचा अवलंब केल्यास तुमचे स्ट्रेच मार्क्स सहज दूर होतील. आता जाणून घेऊया. मोहरीच्या तेलाचे फायदे.

News18लोकमत
News18लोकमत

सर्वोत्तम मॉइश्चरायझर बाजारात उपलब्ध असलेल्या स्ट्रेच मार्क्स रिमूव्हल क्रीम्स केमिकलयुक्त असतात. ज्याचे त्वचेवर काही दुष्परिणामदेखील होऊ शकतात. दुसरीकडे, मोहरीचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. त्यामुळे तुमची सैल त्वचा आकुंचित होऊ लागते आणि त्वचा घट्ट होण्यासोबतच स्ट्रेच मार्क्सही हळूहळू कमी होऊ लागतात. या 7 कारणांमुळे तरुणांनाही येतोय हार्ट अटॅक! तुम्ही या चुका तर करत नाही ना? रक्ताभिसरण चांगले होईल स्किन केअरदरम्यान मोहरीचे तेल वापरल्याने त्वचेचा रंग सुधारतो. याशिवाय शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासही मोहरीचे तेल उपयुक्त आहे. यामुळे तुमचे स्ट्रेच मार्क्स तर निघू लागतातच पण स्किन टोनही सुधारतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात