मराठी बातम्या /बातम्या /देश /

गेल्या वर्षी कोरोना पसरवण्यासाठी जबाबदार ठरलेले तबलिगी आता करताहेत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार

गेल्या वर्षी कोरोना पसरवण्यासाठी जबाबदार ठरलेले तबलिगी आता करताहेत कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार

Tablighi in Tirupati: 'गेल्या वर्षी काही मोजक्या जणांमुळे जम्मात बदनाम झाली. आमच्या कामामुळे परिस्थिती बदलली आहे. सर्व जण सोबत मिळून बंधुतेच्या भावनेतून काम करून या महामारीतून बाहेर पडू.'

Tablighi in Tirupati: 'गेल्या वर्षी काही मोजक्या जणांमुळे जम्मात बदनाम झाली. आमच्या कामामुळे परिस्थिती बदलली आहे. सर्व जण सोबत मिळून बंधुतेच्या भावनेतून काम करून या महामारीतून बाहेर पडू.'

Tablighi in Tirupati: 'गेल्या वर्षी काही मोजक्या जणांमुळे जम्मात बदनाम झाली. आमच्या कामामुळे परिस्थिती बदलली आहे. सर्व जण सोबत मिळून बंधुतेच्या भावनेतून काम करून या महामारीतून बाहेर पडू.'

नवी दिल्ली, 10 मे : तबलिहगी जम्मात या पंथाची ओळख गेल्या वर्षी देशाला झाली ती कोरोना पसरवणारे म्हणून. त्यांच्यावरच्या या कथित आरोपानंतर आता दुसऱ्या लाटेत मात्र या जम्मातचं एक वेगळं रूप समोर येत आहे. गेल्या वर्षी दिल्लीच्या मरकजमध्ये तबलिगी जमातचा कार्यक्रम झाला. त्यानंतर देशभरातील शहरांत आणि गावांत हे तबलिगी कोरोना पॉझिटिव्ह असतानाही गेले होते. सरकारी यंत्रणेला चकवा देऊन काही जण पळाले होते. त्यामुळेच कोरोनाचा प्रसार झाल्याचा ठपका ठेवत जमातीवर प्रचंड टीका झाली होती. या तबलिगी जमातीचे कार्यकर्ते आंध्र प्रदेशातील तिरुपतीमध्ये कोरोनामुळे (COVID-19) मृत्यू झालेल्या लोकांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

या समुदायाने तिरुपती मुस्लीम असोसिएशनच्या (Tirupati United Muslim Association) अंतर्गत जॉईंट अॅक्शन कमिटी (Joint Action Committee) नावाची एक समिती स्थापन केली आहे. ही कमिटी जात किंवा धर्माची पर्वा न करता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहे,याबाबतचं वृत्त द न्यूज मिनिटने दिलंय.

या कमिटीचे सदस्य गौस सांगतात,की गेल्यावर्षी आम्हाला कोरोनाचा प्रसार करण्यासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं. मात्र,आता आम्ही करत असलेल्या कामाचं लोक कौतुक करत आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला असून बेड्स,ऑक्सिजन,वैद्यकिय सुविधांसह स्मशानभूमीतही जागा अपुरी पडत आहे,अशा परिस्थितीत तिरुपतीमध्ये तबलिगी जमातीचे सदस्य पुढे आले असून ते लोकांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

मोठी बातमी..! मुंबई महापालिका 50 लाख लशी ग्लोबल टेंडर काढून खरेदी करणार

गौस सांगतात,की त्यांच्याकडे 60 स्वयंसेवक आहेत. त्यांना मदतीसाठी येणाऱ्या विनंतीनुसार त्या 60 जणांसोबत समन्वय साधून ते काम करतात. गेल्या एक महिन्यापासून ते दिवसाला 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असल्याचंही म्हणाले. पहिल्या लाटेत कमी लोक मृत्यूमुखी पडत होते. त्यात वृद्ध आणि इतर आजार असलेले लोक होते. मात्र,या लाटेत तरुणांचे जीव जात आहेत. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करणं कठीण असतं,असंही गौस म्हणतात.

मृतांच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार

गौस सांगतात की त्यांच्या कमिटीचे 60 सदस्य तीन टीममध्ये काम करतात. प्रत्येक टीमला दर दिवशी कमीत-कमी चार ते पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार(funeral)करण्याचं काम देण्यात आलंय. आम्ही मृताच्या धर्मानुसार त्यांच्या पार्थिवाचा अंत्यविधी करतो. मृत जर हिंदू (hindu)असेल तर मृतदेहावर कापड टाकून फुलांच्या माळा घालतो. ख्रिश्चन असेल तर त्यांचा मृतदेह कॉफिनमध्ये ठेवून चर्चच्या फादरना प्रार्थनेसाठी बोलावतो. आणि मृत जर मुस्लिम असेल तर त्यांच्या रिवाजाप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार करतो. तबलिगी जमातच्या सदस्यांच्या मदतीने आम्ही पीपीई कीटची व्यवस्था करतो. या कामात पोलीस,महानगरपालिकेचे कर्मचारीही त्यांना मदत करत असल्याचं गौस यांनी सांगितलं.

गौस आणि त्यांच्या टीमने आतापर्यंत 536 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यापैकी 134 रुग्ण पहिल्या लाटेत आणि 402 रुग्ण दुसऱ्या लाटेत मरण पावले होते.

दुसऱ्या धर्मातील स्वयंसेवकांचा टीममध्ये समावेश

गौस सांगतात, त्यांच्या टीममधील काही सदस्य रिक्षा चालक, हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत. आमच्या कामापासून प्रेरित झाल्यामुळे अनेक तरुण आमच्या टीमसोबत काम करताहेत. ते तबलिगी जमातीचे सदस्य तर नाहीतच मात्र, ते मुस्लिमही नाहीत.

गेल्या वर्षी कोरोना पसरवण्यास जबाबदार धरल्यानंतर हे काम करताना काही अडचणी आल्या का,असं विचारल्यावर गौस म्हणाले, की गेल्या वर्षी फक्त दोन-तीन जण दिल्लीच्या कार्यक्रमात गेले होते. मात्र, त्यासाठी अनेक लोकांनी आम्हाला जबाबदार धरलं. आता आमच्या कामामुळे परिस्थिती बदलली आहे. सर्व जण सोबत मिळून बंधुतेच्या भावनेतून काम करून या महामारीतून बाहेर पडू.

First published:

Tags: Coronavirus, Tablighi jammat