मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /PM Narendra Modi हल्ली दिवसभरात एकदाच जेवतात; स्वतःच सांगितलं कारण

PM Narendra Modi हल्ली दिवसभरात एकदाच जेवतात; स्वतःच सांगितलं कारण

एक वेळ जेवण्यामागे नेमकं काय आहे कारण?

एक वेळ जेवण्यामागे नेमकं काय आहे कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यांनी आपल्या जेवणाबाबत खुलासा केला आहे.

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : आपण प्रत्येक जण दुपारी आणि रात्री असं दिवसातून दोन वेळा जेवतो. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) दिवसातून एकदाच. त्यांनी स्वतःच हा खुलासा केला आहे  (Pm Narendra Modi eat one time a day). सोबतच त्यांनी यामागील कारणही सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी टोकियो ऑलिम्पिकमधील विजेत्या खेळाडूंना आपल्या निवासस्थानी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या खाण्याबाबत हा खुलासा केला.

ऑलिम्पिकमध्ये भालाफेक करत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रासोबत ते गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांनी त्याला चूरमा घ्यायला दिलं.  नीरजने पीएम मोदींनाही आपल्यासोबत चूरमा खाण्याची विनंती केली. पण मोदींनी त्याला नकार दिला. पंतप्रधान मोदी यांनी आपण दिवसातून एकच वेळ जेवत असल्याचं सांगितलं आणि यामागील कारणही त्यांनी सांगितलं.  आता चातुर्मास आहे आणि यावेळी मी दिवसभरात फक्त एकच वेळ जेवतो, असं ते म्हणाले.

हे वाचा - चुकीच्या वेळी फळं खाणं ठरेल धोक्याचं, जाणून घ्या कधी खावीत

चातुर्मास हा जैन धर्मातील एक पर्व आहे. या कालावधीत धार्मिक कार्य केली जातात. तसंच काही पदार्थ खाणं टाळलं जातं. शिवाय या कालावधीतल वातावरण पाहता लोक दिवसभरात एकाच वेळचं जेवण करतात. पंतप्रधान मोदीसुद्धा याचा अवलंब करतात.

First published:

Tags: Lifestyle, Narendra modi, PM narendra modi