फळं खायला सगळ्यांनाच आवडतात. फळांमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात न्यूट्रिशन आणि व्हिटॅमिन्स मिळतात. याशिवाय त्यामधील पाण्यामुळे शरीर हायट्रेट राहतं. फळांमध्ये मिनरल्स आणि फायबर असतात. त्यामुळे बद्धकोष्टतेची समस्या कमी होते. सिझनल फळं खाल्ल्यामुळे शरीराला पुरेसे पोषक घटक मिळतात. फळांमुळे अन्नपचनालाही मदत होते.