नवी दिल्ली, 26 जुलै : सात समुंदर पार मे तेरे पिछे पिछे आ गई… हे गाणं तर आपल्या प्रत्येकाला माहितीच आहे. एखादी व्यक्ती प्रेमात किती वेडी होते, प्रेमासाठी काहीही करते हे आतापर्यंत आपण फिल्ममध्येच पाहत आलो आहोत. प्रत्यक्ष आयुष्यात तर आपण त्याची कधी कल्पनाही करणार नाही. मात्र जे आपल्या कल्पनेतही नाही ते प्रत्यक्षात करून दाखवल आहे भारतातील एका व्यक्तीने. मूळचे भारतीय असलेले स्वीडिश आर्टिस्ट डॉ. प्रद्ययुम कुमार माहानंदिया (Dr PK Mahanandi) ज्यांना पीके (PK) म्हणूनही ओळखलं जातं, ते आपल्या स्वीडनमध्ये (SWEDEN) राहणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी दिल्लीहून (DELHI) स्वीडनला गेले आणि तेदेखील विमानाने नाही तर चक्क सेकंड हँड सायकल (CYCLE) घेऊन. याच सायकलवरून त्यांनी दिल्लीहून स्वीडन गाठलं. बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने पीकेचं कौतुक करत ही पोस्ट शेअर केली आहे.
प्रद्ययुम यांचा जन्म 1949 साली ओडिशातील एका गरीब कुटुंबात झाला, तिथं त्यांचं शालेय शिक्षण झालं. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी 1971 ते दिल्लीला आले. दिल्लीतील आर्ट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या पोट्रेट्ससाठी त्यांना दूरदूरचे लोक ओळखू लागले. 1975 साली स्वीडनची शॅरलॉट जी लंडनमध्ये शिक्षण घेत होती, ती फक्त पीकेकडून आपलं पोट्रेट बनवून घेण्यासाठी दिल्लीला आली. त्यादरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. शॅरलॉटला आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा लंडनला जावं लागलं. त्यावेळी पीके यांचंही शिक्षण सुरू असल्याने ते तिच्यासोबत गेले नाहीत. मात्र एकमेकांना पत्र लिहून ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. पीके यांना आता लंडनला जायचं होतं मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी आपल्या घरातील सर्व सामान विकलं आणि त्या पैशांतून सेकंड हँड सायकल खरेदी केली. त्यावर आपल्या पेंटिग्स आणि ब्रश घेऊन ते स्वीडनच्या दिशेने निघाले. हे वाचा - फक्त एका पक्ष्याच्या घरट्यासाठी संपूर्ण गाव तब्बल 35 दिवस अंधारात आपल्या अर्धांगिनीला भेटण्यासाठी पीके यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. कित्येक वेळा तर त्यांच्या सायकलनेही त्यांची साथ सोडली होती. मात्र ते हरले नाहीत, थकले नाही की थांबले नाहीत. दिल्लीहून अमृतसर मग तिथून अफगाणिस्तान, इराण, तुर्की, बुल्गारिया, युगोस्लाव्हिया, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क अशा देशांमधून प्रवास करत ते स्वीडनला पोहोचले. पीके स्वीडनच्या गॉटेनबर्ग शहरात पोहोचले. मात्र शॅरलॉट एका रॉयल कुटुंबातील होती, त्यामुळे पीके तिचा पती आहे यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. शॅरलॉटला भेटण्यापूर्वी त्यांना इमिग्रेनशन ऑफिसर्सला भेटावं लागलं. त्यांनी आपल्या लग्नाचा फोटो दाखवला आणि त्यानंतर अखेर पीके आणि शॅरलॉटची भेट झाली. हे वाचा - PPE सूट घालून पाहुण्यांना वाढलं जेवण, अनोख्या लग्न सोहळ्याचा VIDEO VIRAL आज पीके आणि शॅरलॉट यांच्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. त्यांना दोन मुलंही आहेत. आता पीके भारतीय ओरिया सांस्कृतिक राजदूत म्हणून स्वीडनमध्ये काम करतात.