चेन्नई, 25 जुलै : कोरोना लॉकडाऊनमध्ये बहुतेक लोक सध्या घरात आहेत. अशात एक दिवस जरी घरातली लाइट (light) गेली तरी प्रत्येकाची किती चिडचिड होते. मात्र तामिळनाडूतील (tamilnadu) एक गाव एक दोन दिवस नव्हे तर तब्बल 35 दिवस अंधारात (darkness) राहिलं. गावात वीज नाही, वीज बिल भरलं नाही किंवा वीज पुरवठा खंडीत केला असं काहीही कारण यामागे नाही. महिनाभर गाव अंधारात राहण्याचं कारण म्हणजे फक्त एक पक्षी (bird) तामिळनाडूतल्या शिवगंगा जिल्ह्यातील पोथ्थाकुडी गाव एका पक्ष्यासाठी महिनाभरापेक्षा अधिक दिवस अंंधारात राहिलं. या गावाच्या सार्वजनिक स्विचबोर्डला एका पक्ष्याने आपलं घर बनवलं होतं, त्यात अंडी घातली होती. या पक्ष्याला आणि त्याच्या पक्ष्यांना कोणती हानी पोहोचू नये, त्याचं घरटं उद्धवस्त होऊ नये म्हणून गावात लाइट लागल्या नाहीत. टाइम्स ऑफ इंडिया च्या रिपोर्टनुसार या गावात राहणारा विद्यार्थी करूपी राजा याने सांगितलं त्याच्या घराजवळच लाइटचं स्विचबोर्ड आहे. ज्यावर या परिसरातील 35 पथदिवे या स्विचबोर्डशी जोडलेले आहेत. लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा त्याने एका पक्ष्याला या स्विचबोर्डवर आपलं घरटं बांधताना पाहिलं. त्याने गावातल्या आपल्या मित्रमैत्रिणींना आणि इतर लोकांना याबाबत कळवलं. सर्वांना त्याने व्हॉट्सअॅपवरून मेसेज केला आणि वीज बंद करण्याबाबत सूचवलं. हे वाचा - विनामास्क फिरणाऱ्यांना पत्रकारानं असा शिकवला धडा, VIDEO पाहून आवरणार नाही हसू द बेटर इंडिया च्या रिपोर्टनुसार पक्षी आणि त्याच्या घरट्यातील अंडी सुरक्षित राहावी म्हणून या मुलाने वीज बंद ठेवण्याची कल्पना ग्रामस्थांना बोलून दाखवली. फक्त एका पक्ष्यासाठी इतका मोठा निर्णय घेणं हे काही ग्रामस्थांना पटलं नाही. त्यानंतर हा मुलगा गावच्या सरपंचांकडे गेला. सरपंचांनी याची दखल घेतली. कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांनी आपल्या डोक्यावरचं छत गमावलं आहे. या मुक्या जीवालाही तशाच परिस्थितीचा सामना करावा लागू नये म्हणून गावातील वीज खंडीत करण्याचा निर्णय झाला. हे वाचा - VIDEO : चिकन नव्हे तर या डॉलीला आवडते पाणीपुरी; कशी खातेय बघा… लोकांनी हो नाही करत अखेर या चांगल्या कामाला पाठिंबा दिला. जोपर्यंत या स्विचबोर्डवरील घरट्यात पक्षी आपल्या अंड्यांसह असेल तोपर्यंत गावात लाइट न लावण्याचा निर्णय झाला. जवळपास 35 दिवस म्हणजे एका महिन्यापेक्षा जास्त दिवस हे गाव अंधारात राहिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.