मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /शारीरिक नव्हे मानसिक आजाराचं दुखणं; 'या' वेदना म्हणजे Physical stress symptoms

शारीरिक नव्हे मानसिक आजाराचं दुखणं; 'या' वेदना म्हणजे Physical stress symptoms

स्ट्रेस (Stress) म्हणजे तणाव (Symptoms of Stress) ही मानसिक समस्या असली तरी त्याची शारीरिक लक्षणंही (Physical symptoms of stress) दिसून येतात.

स्ट्रेस (Stress) म्हणजे तणाव (Symptoms of Stress) ही मानसिक समस्या असली तरी त्याची शारीरिक लक्षणंही (Physical symptoms of stress) दिसून येतात.

स्ट्रेस (Stress) म्हणजे तणाव (Symptoms of Stress) ही मानसिक समस्या असली तरी त्याची शारीरिक लक्षणंही (Physical symptoms of stress) दिसून येतात.

    मुंबई, 25 नोव्हेंबर : सध्याच्या काळात प्रत्येकाला ताणतणाव म्हणजेच स्ट्रेसचा (Stress) सामना करावा लागतो. तणाव ही मानसिक समस्या (Mental problem) आहे. पण त्याचा शरीरावरही परिणाम होतो (Mental health affect on physical health). त्यामुळे तणावाची (Mental disease) शारीरिक लक्षणंही (Symptoms of stress) दिसून येतात. त्यामुळे तुमच्या शरीरावर बाहेरून दिसून देणारे बदल, शारीरिक समस्या, शारीरिक वेदना म्हणजे शारीरिक आजाराचं दुखणं नव्हे तर मानसिक आजाराचं दुखणं असू शकतं (Physical stress symptoms).

    तुम्हाला छोट्या वाटणाऱ्या शारीरिक समस्या, वेदना म्हणजे तुम्हाला असलेला तणाव असू शकतो. स्ट्रेसमुळे मन अशांत होतं आणि अस्वस्थपणा तर येतोच. पण डोकेदुखी, स्नायूदुखी, पचन समस्या आणि इतर बऱ्याच समस्याही उद्भवतात.  मिरर डॉट को डॉट यूकेच्या रिपोर्टनुसार Livi या आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या संस्थांच्या प्रमुख डॉ. रिहाना मॅकक्लायमाउंट यांनी सांगितलं,  स्ट्रेस ही नैसर्गिक गोष्ट आहे. आपल्या शरीराच्या प्रतिसाद देण्याच्या व्यवस्थेतली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

    स्ट्रेसची शारीरिक लक्षणं

    पुरळ आणि इसब किंवा गजकर्ण : स्ट्रेसमुळे त्वचेवरही परिणाम होतो. कॉर्टिझॉल या स्ट्रेस हार्मोनचा स्राव होतो. त्यामुळे पुरळ येतं. कॉर्टिझॉलमुळे शरीरातलं तेलाचं प्रमाण वाढतं. यामुळे जळजळ वाढते, पुरळ किंवा अगदी इसबही होऊ शकतं. स्ट्रेसमुळे आपल्या त्वचेकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे त्याचा त्वचेवर परिणाम होतो, असं सौंदर्यतज्ज्ञ डॉ. रेखा टेलर यांचं म्हणणं आहे.

    हे वाचा - या 5 सवयींनी करा तुमच्या दिवसाची सुरुवात; शरीर आणि मन नेहमी राहील प्रसन्न

    त्यासाठी दररोज त्वचेची काळजी घेणं, फळं आणि भाज्यांसह योग्य आहार घेणं, रक्तातली साखर नियंत्रित करण्यासाठी कर्बोदकं आणि प्रथिनांचं योग्य प्रमाण आहारात ठेवणं हे महत्त्वाचं असल्याचं त्या सांगतात.

    पोटाच्या तक्रारी : स्ट्रेस असताना कधीकधी मळमळ होते, जुलाबही होतात. स्ट्रेसमुळे शरीरातलं हॉर्मोन्सचं संतुलन बिघडतं, ब्लोटिंग होतं, आतड्यांवर परिणाम होतो. शरीरात आम्लपित्त अर्थात अॅसिड वाढतं. त्यामुळे पोटाचा अल्सर, हिरड्यांचे आजार आणि तोंडाचा अल्सर होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे महत्त्वाचं आहे.

    वजनात बदल : कॉर्टिझॉलची पातळी वाढल्याने वजन कमी करणं अवघड होतं. जुनी टेन्शन असतील आणि त्यामुळे स्ट्रेस वाढत असेल, तर अशा वेळेस ज्यामुळे पटकन बरं वाटतं असं खाणं आपल्याला आवडतं. त्यानं आपल्या मनाला बरं वाटतं. हे असे पदार्थ खाल्ल्यामुळे तात्पुरतं बरं वाटतं; पण त्यानं आपल्या पोटावर परिणाम होतो, असं डॉ. रिहाना यांचं म्हणणं आहे.

    रोगप्रतिकार शक्ती : सतत ताणतणावाचा सामना करणाऱ्यांच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे अशा व्यक्तींना सर्दी, ताप आणि अन्य संसर्ग पटकन होतात.

    तीव्र वेदना आणि टेन्शनमुळे डोकेदुखी : स्ट्रेसमुळे तीव्र वेदना होणं हे एक नेहमीचं लक्षण आहे. संधिवाताची सुरुवातही यामुळे होते. अनेकदा ब्लड टेस्ट किंवा एक्स रेमध्येही या गोष्टी स्पष्ट होत नाहीत. तसंच डोकेदुखी, अर्धशिशीचा आजारही जडू शकतो. त्यामुळे अर्धांगवायू किंवा अन्य वेदनादायी आजारही उद्भवू शकतात.

    हे वाचा - Health News: Stress आणि anxiety मध्ये काय आहे फरक? जाणून घ्या कारणं आणि लक्षणं

    यासाठी पुरेशी आणि ठरावीक झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उशिरापर्यंत मोबाइल बघणं, दारू, अति जेवण आणि निकोटीनचं सेवन यामुळे झोपेत व्यत्यय येतो. कॅफेनयुक्त पेय प्यायलानंतर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर किमान सहा तास राहतो. त्यामुळे संध्याकाळी खूप उशिरा कॉफी घेऊ नका असा सल्ला तज्ज्ञ देतात.

    गोंधळ उडणं : आपल्या हातातून काही गोष्टी निसटून चालल्या आहेत अशी भावना स्ट्रेसमुळे निर्माण होऊ शकते. अशा वेळेस योग्य व्यवस्थापन किंवा नियोजन करणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, अति महत्त्वाचे आणि तातडीचे, तातडीचे नाही पण महत्त्वाचे, तातडीचे पण महत्त्वाचे नाही आणि महत्त्वाचेही नाही आणि तातडीचेही नाही अशा प्रकारे तुमच्या कामांची विभागणी करा. यामुळे तुम्हालाच तुमच्या कामात स्पष्टता येईल. गोंधळ उडणार नाही.

    स्ट्रेसचा सामना कसा करावा?

    एका ठरावीक प्रमाणापर्यंतचा पॉझिटिव्ह स्ट्रेस आपल्याला पुढे जाण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठीचा महत्त्वाचा घटक ठरतो; मात्र स्ट्रेसमुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम होत असेल आणि तुम्ही आजारी पडत असाल तर मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या स्ट्रेसचा सामना करण्यासाठी Pharmacy2U येथील सुपरिटेंडंटनी दिलेल्या काही टिप्स.

    हे वाचा - Stress वाढल्यावर नेमकं काय करावं? निगेटिव्ह स्ट्रेस कमी करण्याचे हे आहेत सोपे उपाय

    व्यायाम : व्यायामामुळे अर्थातच स्ट्रेस पूर्ण जाणार नाही; पण त्यामुळे तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. व्यायामामुळे तुमच्या मेंदूत काही रासायनिक बदल घडतात. त्यामुळे शरीरातील सेरोटॉनिनची पातळी वाढते आणि काहीसा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.

    श्वासावर नियंत्रण : स्ट्रेसमध्ये काही वेळेस आपल्याला श्वासांची गती बदलल्यासारखी, वाढल्यासारखी वाटते. अशा वेळेस श्वासावर नियंत्रण ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यामुळे तुमच्या श्वासाचा वेग कमी होतो आणि तुम्हालाही शांत व्हायलाही मदत होते. एक ते पाच आकडे म्हणत तुमच्या नाकावाटे श्वास घ्या आणि तो तोंडावाटे सोडा. ही क्रिया तीन ते पाच मिनिटं करा.

    असा आहार टाळा : स्ट्रेसमध्ये अनेक जण चहा, कॉफी, दारू पितात किंवा धूम्रपानही करतात. कॅफेनमुळे शांत झोप लागत नाही आणि या सवयींचा तुमच्या एकूणच शरीरावर वाईट परिणाम होतो. मद्यपान किंवा धूम्रपानामुळे कदाचित काही काळ स्ट्रेस कमी झाल्यासारखा वाटतोही; पण हा परिणाम अगदीच थोडा वेळ असतो आणि त्यामुळे भविष्यात कदाचित आणखी काही मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

    First published:

    Tags: Health, Lifestyle, Mental health, Stress