• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Morning Habits : या 5 सवयींनी करा तुमच्या दिवसाची सुरुवात; शरीर आणि मन नेहमी राहील प्रसन्न

Morning Habits : या 5 सवयींनी करा तुमच्या दिवसाची सुरुवात; शरीर आणि मन नेहमी राहील प्रसन्न

प्रत्येक सकाळची (Morning) सुरुवात नेहमी अशी असावी की, संपूर्ण दिवस ताजेतवाना आणि उत्साहानं भरलेला असेल. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आणखी आनंद हवा असेल तर, तुमच्या सकाळच्या सवयींमध्ये थोडा (Morning Habits) बदल करा.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : जीवन चांगले जगण्यासाठी शिस्तबद्ध असणं फार महत्वाचं आहे. आपल्या सवयीच आपल्याला पुढे नेतात किंवा आपल्याला आयुष्यात मागे ढकलतात. प्रत्येक दिवसाची सुरुवात आयुष्यात आशेचा एक नवीन किरण घेऊन येते. तेव्हा प्रत्येक सकाळची (Morning) सुरुवात नेहमी अशी असावी की, संपूर्ण दिवस ताजेतवाना आणि उत्साहानं भरलेला असेल. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आणखी आनंद हवा असेल तर, तुमच्या सकाळच्या सवयींमध्ये थोडा (Morning Habits) बदल करा. यामुळं तुमच्या जीवनात मोठा बदल होऊ शकतो. आताच्या धकाधकीच्या आयुष्यात आपलं शरीर आणि मन नेहमी निवांत आणि शांत राहणं आवश्यक आहे. जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. यासह, आपण आपल्या सकाळच्या दिनचर्येच्या सवयी बदलून आनंदी जीवन जगू शकता. 1. मॉर्निंग वॉक (Morning walk) - सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत फेरफटका मारण्यासाठी जाणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे. वृद्धांपासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येकजण सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक करण्याचा सल्ला देतो. तरीही, बहुतेक लोक सकाळी लवकर उठण्यात आळशीपणा करतात. त्यांची मॉर्निंग वॉकचा आनंद घेण्याची संधी हुकते. सकाळी चालण्यानं आपलं शरीर व्यवस्थित काम करतं आणि किरकोळ आजार अजिबात जवळ येत नाहीत. यामुळे आपले वजन नियंत्रित होऊ लागते. सकाळची ताजी हवा आपल्या शरीराला तसेच मनाला आराम देते. 2. योगप्रकारांचा व्यायाम करा - या धावपळीच्या जीवनात, आपण सर्व कामांसाठी वेळ देता-देता स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला विसरतो. तुमचीही अशीच स्थिती असेल तर तुमच्या काही सवयी बदला आणि शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगसाधनांची मदत घ्या. सकाळी 10 मिनिटांचा योग तुमच्या जीवनात मोठा बदल घडवू शकतो. हे वाचा - एक लाखाचे तीन कोटी! ‘या’ बँकेच्या स्टॉकमध्ये 30,472 रुपयांची नव्हे टक्क्यांची वाढ, अजूनही कमाईची संधी 3. सकाळी उपाशीपोटी पाणी प्या - आपल्या अनेक शारीरिक समस्यांचे समाधान सकाळी उठणे आणि पाणी पिणे यात आहे. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यानं शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते आणि आपल्याला ऊर्जा मिळते. सकाळी उपाशीपोटी एक लिटर (- हे प्रमाण प्रौढांसाठी असून 100 मिलीपासून सुरुवात करून वाढवत न्यावे) कोमट पाणी आणि दिवसभरात एकूण साडेतीन ते चार लिटर पाणी पिणं शरीरासाठी आवश्यक आणि लाभदायक आहे. 4. सकाळी पौष्टिक, आरोग्यवर्धक नाश्ता करा - आपल्यापैकी बरेच जण असे आहेत, ज्यांना सकाळी नाश्ता करण्यात फारसा रस नसतो. काही लोक दररोज नाश्ता करतात आणि नाश्त्यासाठी पौष्टिक पदार्थांचा वापर करत नाहीत. मात्र, जर शरीर दिवसभर ऊर्जेनं परिपूर्ण ठेवायचं असेल तर प्रथिनयुक्त अन्नपदार्थांचा वापर दररोज नाश्त्यामध्ये करावा. यासह, आपल्याला लवकर भूक लागणार नाही आणि आपण अति खाण्यापासून दूर रहाल. तसंच, शरीरातील चरबीही वाढणार नाही. हे वाचा - एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे सनी देओलची पत्नी!मात्र प्रसिद्धीपासून राहते दूर 5. सकाळी देवाचं विनम्रपणे स्मरण करून आभार माना - सकाळी उठून अशा सर्व गोष्टी कराव्यात, ज्यामुळं तुमचं हृदय प्रसन्न होईल. सकाळी उठल्यानंतर तुमच्या आयुष्यासाठी देवाचे किंवा तुमचे प्रेरणास्थान असलेल्या कोणाचेही आभार नक्की माना. त्यानं दिलेल्या आपल्या आयुष्यात असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी आठवा. (Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सामान्यरीत्या उपलब्ध ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: