मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

PGStory: तीन मित्र दीड दिवसांपासून दारू पित होते; एकाने अचानक विचारलं, “याच्या बॉडीचं काय करायचं?”

PGStory: तीन मित्र दीड दिवसांपासून दारू पित होते; एकाने अचानक विचारलं, “याच्या बॉडीचं काय करायचं?”

रात्रभर आणि दिवसभर दारु प्यायल्यामुळे डोकं सुन्न झालं होतं. तेवढ्यात मित्राने विचारलं, याच्या बॉडीचं काय करायचं? प्रश्न ऐकून मला धक्काच बसला.

रात्रभर आणि दिवसभर दारु प्यायल्यामुळे डोकं सुन्न झालं होतं. तेवढ्यात मित्राने विचारलं, याच्या बॉडीचं काय करायचं? प्रश्न ऐकून मला धक्काच बसला.

रात्रभर आणि दिवसभर दारु प्यायल्यामुळे डोकं सुन्न झालं होतं. तेवढ्यात मित्राने विचारलं, याच्या बॉडीचं काय करायचं? प्रश्न ऐकून मला धक्काच बसला.

  • Published by:  desk news

‘न्यूज18 लोकमत’ची नवी मालिका PG story चा हा पहिला भाग आहे. जे तरुण आणि तरुणी करिअरसाठी आपलं गाव सोडून महानगरांमध्ये आले, त्यांना आलेल्या अनुभवांवर आधारित ही मालिका आहे. आपल्यापैकी अनेकांना घरापासून दूर, वेगळ्या शहरात पेइंग गेस्ट म्हणून राहण्याचा अनुभव असेल. या मालिकेत मांडण्यात आलेले अनेक अनुभव कदाचित तुम्हालाही आले असतील. 


हे गोष्ट आहे 27 वर्षांच्या प्रणव (नाव बदललेलं आहे) नावाच्या तरुणाची. 19 व्या वर्षी प्रणव जयपूरहून दिल्लीला करिअर घडवण्यासाठी आला. गेल्या 8 वर्षात दिल्लीत त्यानं वेगळ्याच आय़ुष्याचा अनुभव घेतला. प्रणव हा इंजिनिअर आहे.  

राजस्थानमधील पाकिस्तान बॉर्डरवरच्या गंगानगर नावाच्या छोट्याशा शहरात आठवीपर्यंतचं शिक्षण झालं. नववीत असतानाई आईवडील जयपूरला शिफ्ट झाले. वडिलांचे बहुतांश मित्र हे पायलट होते. त्यामुळे लहानपणापासूनच मी पायलट या प्रकाराबद्दल इतकं ऐकलंय की आता त्याबाबत काउन्सिलिंगही करू शकतो. पायलट होण्यासाठी फारशी मेहनत करावी लागत नाही, असं ते नेहमी सांगायचे. बारावीत सायन्स घेऊन 60 टक्के मार्क्स मिळाले आणि थोडे पैसे खर्च केले की पायलट होण्याचा मार्ग मोकळा.

हे वाचा #HumanStory: ओळख लपविण्यासाठी रुग्ण हेल्मेट घालून आला, सेक्सॉलॉजिस्टच्या आयुष्यातील अनुभव

 या कल्पनेनं मला चांगलीच भुरळ घातली होती. मला पायलट झाल्याची स्वप्नं पडू लागली होती. पायलट होण्याचं असं काही वेड लागलं की होती केवळ त्यासाठी अकरावीला मी सायन्स शाखेत प्रवेश घेतला. मात्र केमिस्ट्री विषय डोक्यावरून जात होता. केमिस्ट्रीचे प्रश्नच मला समजायचे नाहीत, त्यामुळे उत्तरं येण्याचा प्रश्नच नव्हता. अकरावीला मी नापास झालो आणि पायलट होण्याच्या माझ्या स्वप्नाचा चक्काचूर झाला.

नापास झाल्यावर लक्षात आलं की इतिहासाचा अभ्यास करूनही आयुष्यात काहीतरी करता येऊ शकतं. जयपूरच्या राष्ट्रीय विद्यालयात प्रवेश घेतला आणि अकरावी आणि बारावीत टॉपर आलो. याच काळात सहा महिन्यांसठी आईवडीलांसोबत दिल्लीत राहावं लागलं. त्यामुळे दिल्ली विद्यापीठात काही ना काही कारणांनी जात राहिलो आणि त्यानंतर तिथंच पुढचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

जयपूर ते दिल्ली प्रवास… एकट्याचा…

सेंट स्टीफन कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी जयपूरहून दिल्लीला एकटाच आलो. दिल्लीत वडिलांच्या मित्रांच्या घरी उतरायचं ठरलं होतं. जयपूरहून बसने दिल्लीला आलो आणि तिथून ऑटो रिक्षा पकडून लक्ष्मीनगरमध्ये असणाऱ्या त्यांच्या घरी पोहोचलो. दिल्लीत पहिल्यांदाच सार्वजनिक वाहनांतून एकट्याने प्रवास करण्याचा अनुभव घेत होतो. सकाळी 7 वाजता नातेवाईकांच्या घरी पोहोचलो आणि लगेचच मला गरमागरम चहाचा एक कप मिळाला. आता लगेच जेवण करून घे, असा आतून आवाज आला. मी शॉक्ड. मनात विचार आला, एवढ्या सकाळी सकाळीच जेवायचं?

नाश्त्यात चहासोबतच भरपेट जेवण… विचित्रच काहीतरी…

त्या घरात आठजण होते आणि मी नववा. एका ताटातून बटाट्याची भाजी, वरण, भात, चपाती हे पदार्थ एकमेकांत मिसळू लागले होते. ताटात वाटी, चमचे वगैरे काहीच नव्हतं. 

पहिल्यांदाच नॉर्थ कँपसमध्ये गेलो. डीन ऑफिसमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन फॉर्म भरला. काही उतावीळ मुलं ऍडमिशन फॉर्ममध्ये वुमन्स कॉलेजचंही नाव लिहितात, मी सुद्धा त्यांच्यापैकीच एक. रामजसमधून हिस्ट्रीची ऑनर्स पदवी मिळवली आणि जयपूरमधून गाशा गुंडाळून थेट दिल्ली गाठली.

दिल्लीतील पहिला पीजी

विद्यापीठात वडिलांचे ज्युनिअर असणाऱ्यांसोबत राहत होतो. ते अजूनही तिथंच शिकत होते. कुणी माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठं होतं, तर कुणी 10 वर्षांनी. हरियाणातील जमीनदार कुटुंबातील या विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स कोट्यातून प्रवेश मिळवला होता. ते सगळे पहाटे चार वाजता डीयूपासून सीपीपर्यंत धावण्यासाठी जात असत. त्यातील बहुतेकांनी डबल एमए केलं होतं. ते एकूण आठजण होते आणि नववा. त्यापूर्वी मी एका घरात एकाच वेळी एवढ्या अंडरविअर वाळत घातलेल्या कधीच पाहिल्या नव्हत्या. 

हे वाचा- पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीय कैद्याला कसं वागवतात? वाचा, एका गुप्तहेराचे अनुभव

ते सगळे आता युनिव्हर्सिटीतले ‘भाई’ झाले होते आणि कँपसमध्ये त्यांचा चांगलाच वट होता. त्यांच्या घरात माझी भूमिका ही ‘सत्ते पे सत्ता’ सिनेमातल्या हेमामालिनीसारखी होती. वडिलांनी रुमचं भाडं दिलं आणि वरखर्चाचे 2 हजार रुपये. पॉकेटमनी. 2010 मध्ये महिन्याभराच्या खर्चासाठी 2000 रुपये पुरेसे असायचे. मी अख्खं घर साफ केलं, खोलीत गाद्या घातल्या. थंडीमध्ये हात शेकण्यासाठी त्यांनी एक शेगडी आणून ठेवली होती. घरात चार विटा रचून त्यावर ती शेगडी ठेवली आणि स्वयंपाकाला सुुरुवात केली.

बाजारातून 10 रुपयांची साखर आणि चहा पावडर आणली. पण मी दोनच महिन्यांत त्या माणसांना वैतागलो. त्यांचं काहीच शेड्युल नसायचं. ना अभ्यास, ना काही करिअर करण्याची इच्छा. त्यांच्याकडे पैसे भरपूर असायचे. त्यातून ते ऐषोआरामात जगत होते. मी मात्र शाळेतून कॉलेजात दाखल झालेला एक नवखा मुलगा होतो, ज्याला शिकण्याची इच्छा होती.

त्या भैय्या लोकांसाठी मी रुममधली एखादी वस्तू असल्यासारखा होता. वाटेल तेव्हा उचलून बाहेर वाटेल त्या खोलीत ठेवायचे, तर कधी घराबाहेर राहायला सांगायचे.

कॉलेजमध्ये चौघांशी मैत्री झाली. आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 2010 साल होतं ते. दिल्लीत कॉमनवेल्थ गेम्स झाल्या तो काळ. मी नवी रुम शोधण्याचा प्रयत्न केला, पण मिळत नव्हती. युनिव्हर्सिटीच्या सर्व कॉलेजच्या हॉस्टेल्स या कॉमनवेल्थसाठी येणाऱ्या गेस्टना देण्यात आल्या होत्या. हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांनाही दुसरीकडे सोय करावी लागली होती. दोन महिन्यांनी त्यांना परत हॉस्टेलमध्ये राहायला जागा देण्यात आली.

घर 6-7 हजारांपेक्षा कमी पैशांत मिळत नव्हतं. बराच शोध घेतल्यानंतर एक खोली मिळाली. तिचं भाडं होतं 4 हजार रुपये. आम्ही दोन मित्रांनी दोन-दोन हजार भाडं देण्याची तयारी करत ती रूम घेतली.

पहिली रुम होती खास

आम्हाला मिळालेली आमची पहिली रुम खास होती. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या नॉर्थ कँपसजवळ असणाऱ्या कमला नगरमध्ये चायनीज रेस्टो थापाच्या गल्लीत ही रुम होती. आमच्या खोलीत रेस्टोचा एक्स्झॉस्ट लावलेला होता. त्या खोलीत फारच उकडायचं, पण मी माझ्या पद्धतीनं ती रुम सजवली. एका कोपऱ्यात जयपूरवरून आणलेली गादी पसरली. आतापर्यंत त्या गादीची अवस्था फारच दयनीय झाली होती. एका कोपऱ्यात पुस्तकांचा रॅक, एका कोपऱ्यात विटांवर मांडलेली चूल आणि तिच्या आजूबाजूला भांडीकुंडी. एका कोपऱ्यात खुर्ची. हीच काय ती आमची ड्रॉइंड रुम. वॉशरुम खोलीच्या बाहेर रस्त्यावर होतं. पण स्वच्छ होतं आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त आमचं होतं. 

मला साफसफाई आणि टापटिप यांची आवड होती. तर माझा मित्र याच्या बरोबर उलटा आणि घाणेरडा होता.  अंघोळ न करणे, भांडी न घासणे, कपडे न धुणे हेच त्याचे छंद होते. त्याच्याकडे एकच शॉवर जेल होता. आपले कपडे, चेहरा, केस हे सगळे तो याच जेलने धुवून काढत असे. 

पैसे संपल्यावर रेस्टोकडून घ्यायचो फुकट जेवण

जेव्हा आमच्यासारख्या मुलांकडचे पैसे संपायचे, तेव्हा आम्ही रेस्टोवाल्या थापाकडे धाव घ्यायचो. तो आम्हाला फुकटात मोमोज आणि चाउमिज द्यायचा. त्या खोलीत आम्ही चार महिने राहिलो. मला महिन्याच्या खर्चासाठी मिळणाऱ्या 2000 रुपयांपैकी मी दररोज 30 रुपये सेव्हिंग करत असे. 

घरच्यांची आठवण यावी, असं काही घडत नव्हतं. दिल्लीच्या दुसऱ्या टोकाला राहणारे मित्र त्यांच्या घरी पोहोचायला जेवढा वेळ लागायचा, तेवढ्याच वेळेत मी जयपूरला पोहोचू शकत होतो.

वाचा -  'त्याला घरजावई करा आणि...'; नवरा-बायको वादाच्या प्रकरणात कोर्टाचा अजब आदेश

आर्थिक संकट हे लोकांसाठी त्रासदायक असू शकतं. मात्र मी त्याला आयुष्याचाच एक भाग मानत होतो. जेव्हा माझे मित्र सिगरेट ओढायचे, तेव्हा मी 10 रुपये माझ्या बॅगेतल्या वेगळ्याच खिशात ठेऊन द्यायचो. ते पैसे एका पेटीत साठवायचो. आजच्या काळात 30-40 रुपये म्हणजे काहीच वाटत नाही. मात्र महिन्याच्या शेवटी 1000-1500 रुपये जमा होणं, ही काही साधी बाब नव्हती.

विद्यापीठात तीन वर्षं पायी प्रवास

विद्यापीठातील तिन्ही वर्षं मी सगळीकडे पायी चालत जायचो. कित्येकदा जेवण्यासाठी पैसे नसायचे. मेट्रो कार्डमधील 100 रुपये कॅश करून घ्यायचो. तसं करताना त्यातील 10 रुपये कट होत असत. डियूनं जीटीबी नगर रेल्वे स्टेशनपर्यंत पायी चालत जायचो. तिथं 90 रुपयांना दोन थाळ्या जेवण मिळायचं. तिथं आम्ही भरपेट जेवायचो आणि उद्याची चिंता न करता शांतपणे झोपी जायचो. 

नव्या फ्लॅटमध्ये नशाबाज दोस्त

थापाचा फ्लॅट सोडला आणि नव्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. या फ्लॅटचं नाव ठेवलं पिंक फ्लॅट. त्याचं भाडं होतं 9 हजार रुपये. या घरात आम्ही तीन मित्र राहायचो. माझे दोन्ही मित्र दिवसरात्र गांजा ओढत बसलेले असायचे. त्यांच्या खोलीत सतत धूर-धूर असायचा. आमच्याकडे कामाला येणारी बाई त्यांच्या खोलीत साफसफाई करायला तयार नसायची. त्या खोलीत आपल्याला कसला तरी घाणेरडा वास येतो आणि आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं, असं ती सांगायची. ते लोकं गोल-गोल काहीतरी बनवतात आणि चिलीम ओढल्याप्रमाणे फुंकत बसतात, असं ती सांगायची. 

दीड दिवस प्यायलो दारू

आयुष्यात पहिल्यांदा मी दारू प्यायलो, ती याच रुमवर. 190 रुपयांची ‘रोमानो’ची बाटली आणली होती. आता त्या दारुचं नाव जरी ऐकलं तरी मित्र म्हणतात, विष पीत होतास की काय? 

एकदा दुपारी आम्ही दारु प्यायला बसलो. तो पूर्ण दिवस, पूर्ण रात्र, दुसरा पूर्ण दिवस आणि रात्र असं करत पहाटे तीन वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम सुरू होता. आमच्या शरीरातले त्राण पूर्णतः निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्यापैकी एकाची आई येणार होती. तेवढ्यात एकजण म्हणाला की मी दारूची बाटलीच फोडून टाकतो. मी त्याच्या हातातून ती बाटली हिसकावून घेतली. मग त्याने विचारलं, ‘याच्या बॉडीचं काय करायचं?’ हा प्रश्न ऐकून माझी हवाच टाईट झाली. मी गोंधळलो, जाम घाबरलो. हे काय बोलतोयस तू, असं मित्राला विचारलं. 

तो विचारत होता की या तिसऱ्या मित्राच्या बॉडीचं काय करायचं? मला काहीच समजत नव्हतं. मी माझ्या जागेवरून उठलो, बाथरूमजवळ पडलेल्या मित्राच्या नाकापाशी हात नेऊन चेक केलं. त्याचा श्वास सुरू होता. पोटही मऊ होतं. मी त्याच्या तोंडावर थोडा व्होडका शिंपडला. तो शुद्धीवर आला. मग आम्ही रिलॅक्स झालो आणि तिघंही तिथंच झोपलो. दुसऱ्या दिवशी उठलो, घर सांभाळलं, फोन चार्ज केले. त्याच मोबाईलमध्ये झालेल्या रेकॉर्डिंगमुळेच या सर्व गोष्टी आम्हाला समजल्या.

First published:

Tags: Beer, Delhi, Friendship, PG story