मुंबई, 20 फेब्रुवारी : स्त्रियांच्या शरीरात मासिक पाळीमुळे दर महिन्याला बदल होत असतात. मासिक पाळीचं चक्र प्रत्येक स्त्रीचं वेगवेगळं असतं. त्यानुसार होणारे शारीरिक बदलही वेगवेगळे असतात. मासिक पाळीदरम्यान, त्या आधी किंवा त्या नंतर स्त्रियांना काही त्रास जाणवू शकतो. व्हाईट डिस्चार्ज, योनीबाहेरील भागात थोडी खाज येणं या गोष्टी सामान्य असतात. मात्र मासिक पाळीच्या दिवसांव्यतिरिक्त रक्तस्राव होणं, अनियंत्रित लघवी होणं, ओटीपोटात सतत दुखणं यांसारख्या काही समस्या जाणवत असतील तर ती धोक्याची सूचना असते. त्याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. बेंगळुरूच्या फोर्टिस रुग्णालयातील ओब्स्टेट्रिक्स आणि युरो गायनॅकॉलॉजी विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. रूबिना शाहनवाझ यांनी त्याबाबत मार्गदर्शन केलं आहे. मासिक पाळी व योनीमार्गाशी संबंधित स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे अशा काही तक्रारी स्त्रियांना जाणवू शकतात.
कमी वयात मासिक पाळी बंद करण्याकडे वाढतोय मुलींचा कल! पाहा कोणती आहे ही ट्रीटमेंट1. खाज येणं योनीमार्गाच्या बाहेरच्या किंवा आतल्या भागात खाज सुटण्याची समस्या काही स्त्रियांना जाणवते. मासिक पाळीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या नॅपकिन्समुळे किंवा इतर काही कारणांनी रॅश आल्यामुळे योनीच्या बाहेरच्या बाजूला खाज येऊ शकते. अॅलर्जीमुळेही खाज येण्याची शक्यता असते. तसं नसेल, तर फंगल इनफेक्शन किंवा व्हायरल इनफेक्शनमुळेही अशी खाज येते. योनीच्या आतल्या बाजूला खाज सामान्यपणे यीस्ट इनफेक्शनमुळे येते. ज्यावेळी पांढऱ्या रंगाचा घट्ट व्हाईट डिस्चार्ज होतो, त्यावेळी अशी खाज येते. मात्र असा डिस्चार्ज होत नसेल, तर ही खाज योनी मार्ग कोरडा पडल्यानं येऊ शकते.
2.लघवीवेळी जळजळ मूत्र संसर्गामुळे लघवीवेळी जळजळ होऊ शकते. यामध्ये सतत लघवीला जावं लागतं. त्यामुळे ही जळजळ होते. तशी तपासणी करून घेतल्यास संसर्ग दूर करण्यासाठी उपचार घेता येतात. मात्र असा संसर्ग नसेल, तर मेनोपॉजनंतर काही हॉर्मोन्स कमी झाल्यामुळे मूत्र मार्ग अरूंद होतो व अशाप्रकारे जळजळ होऊ शकते. 3.अनियंत्रित लघवी मूत्र संसर्गामुळेच हेदेखील घडू शकतं. मात्र मूत्र संसर्ग हे त्या मागचं कारण नसेल, तर त्यासाठी काम करणाऱ्या स्नायूंच्या अशक्तपणामुळेही लघवीवरचं नियंत्रण कमी होऊ शकतं. असे स्नायू अशक्त झाल्यामुळे अनपेक्षितपणे लघवी होऊ शकते. 4.खूप जास्त डिस्चार्ज मासिक पाळीच्या लगेचच नंतर किंवा मासिक चक्राच्या मधल्या काळात होणारा पांढऱ्या रंगाचा किंवा रंग नसलेला डिस्चार्ज ही सामान्य गोष्ट आहे. मात्र हा डिस्चार्ज पिवळा, हिरवट रंगाचा किंवा दाट पांढरा असेल तसंच त्याला घाण वास येत असेल व त्यामुळे खाजही येत असेल, तर ही धोक्याची घंटा आहे. व्हाईट डिस्चार्ज सतत होणं हीदेखील चांगली गोष्ट नाही. त्याकडे दुर्लक्ष करू नये. 5. योनीबाहेर फोड येणं योनीबाहेरचे केस काढणं व त्यासाठी विविध उत्पादनांचा वापर करणं याचा परिणाम म्हणून काही वेळेला योनीच्या बाहेरच्या भागात फोड येऊ शकतात. त्या फोडांमध्ये पाणी असेल, थोडी जळजळ होत असेल, तर हे Genital Herpes Infection असू शकतं. त्यासाठी उपचार घेता येतात. योनीच्या खालच्या बाजूला असे फोड आले असतील व खूप दुखत असतील, तर त्यात पू आहे का हे पाहून तो तपासला पाहिजे. 6. अनपेक्षित रक्तस्राव मासिक पाळीच्या चक्राव्यतिरिक्त एरवी कधीही अचानक रक्तस्राव झाल्यास ती सामान्य गोष्ट नसते. मासिक चक्राच्या मध्यात काहीवेळा काही थेंब रक्तस्राव होतो किंवा संभोगानंतर तसं होऊ शकतं. त्याचप्रमाणे लघवीवेळीही रक्तस्राव होऊ शकतो. या सर्वच बाबतीत स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं जास्त योग्य असतं. 7. योनीमार्गातील कोरडेपणा शरीर संबंधांनंतर जर योनीमार्गात कोरडेपणा जाणवला, तर ते स्नेहन कमी पडल्यामुळे होतं. योनीमार्गातील संसर्गाकडे दुर्लक्ष केल्यानंही काही वेळेला असा कोरडेपणा येऊ शकतो. मेनोपॉजनंतर जाणवल्यास हॉर्मोन्सची कमतरता हे त्यामागचं कारण असू शकतं. 8. योनीमधून काही बाहेर आल्यासारखं वाटणं पेल्विक फ्लोरचे स्नायू अशक्त झाल्यामुळे मूत्राशय, गर्भाशय तसंच गुदाशय खाली येतात व काहीतरी मांसल भाग बाहेर येत असल्याची जाणीव होते. मल व मूत्र विसर्जनास त्रास होत असेल तर तसं घडू शकतं.
मासिक पाळीपूर्वी ब्रेस्ट पेन होणे सामान्य, पण ही लक्षणं दिसल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला9. बद्धकोष्ठता पुरेसं पाणी पिऊनही किंवा तंतूमय आहाराचं सेवन करूनही जर बद्धकोष्ठता होत असेल, तर त्यामुळे मल-मूत्र विसर्जनाच्या मार्गात अडथळे येणं किंवा रेक्टल वॉल अशक्त होणं या गोष्टी घडू शकतात. 10. सतत ओटीपोटात दुखणं यामागे अनेक कारणं असू शकतात. स्नायू दुखावणं, मूत्र संसर्ग, आतड्याचा संसर्ग किंवा या अवयवांमधील असामान्य वाढ असं कोणतंही कारण त्यामागे असू शकतं. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानं रक्त तपासणी, सोनोग्राफी अशा चाचण्या करून ते कारण शोधता येऊ शकतं.