मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /कमी वयात मासिक पाळी बंद करण्याकडे वाढतोय मुलींचा कल! पाहा कोणती आहे ही ट्रीटमेंट

कमी वयात मासिक पाळी बंद करण्याकडे वाढतोय मुलींचा कल! पाहा कोणती आहे ही ट्रीटमेंट

मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेकदा असह्य वेदनेचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही महिला किंवा मुलींना हे नकोसे वाटते. म्हणूच काही स्त्रिया कमी वयातच मासिक पाळी बंद करण्याचा विचार करतात. चला तर मग पाहुयात याविषयी सविस्तर माहिती.

मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेकदा असह्य वेदनेचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही महिला किंवा मुलींना हे नकोसे वाटते. म्हणूच काही स्त्रिया कमी वयातच मासिक पाळी बंद करण्याचा विचार करतात. चला तर मग पाहुयात याविषयी सविस्तर माहिती.

मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेकदा असह्य वेदनेचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही महिला किंवा मुलींना हे नकोसे वाटते. म्हणूच काही स्त्रिया कमी वयातच मासिक पाळी बंद करण्याचा विचार करतात. चला तर मग पाहुयात याविषयी सविस्तर माहिती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 6 फेब्रुवारी : एका विशिष्ट वयापासून वयाच्या अंदाजे 40 व्या वर्षापर्यंत मुलींना मासिक पाली येते. नमहिलांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण म्हणजेच आई होण्यासाठी हे खूप महत्वाचे असते. मात्र यादरम्यान महिलांना अनेकदा असह्य वेदनेचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही महिला किंवा मुलींना हे नकोसे वाटते. म्हणूच काही स्त्रिया कमी वयातच मासिक पाळी बंद करण्याचा विचार करतात. चला तर मग पाहुयात याविषयी सविस्तर माहिती.

मासिक पाळी बंद करण्यासाठी मेन्स्ट्रुअल सप्रेशनचा मार्ग अवलंबला जातो. यामध्ये गोळ्यांच्या मदतीने मासिक पाळी थांबवता येते, त्यांची वारंवारता कमी केली जाऊ शकते किंवा याअंतर्गत रक्त प्रवाहदेखील कमी करता येतो. यासाठी स्त्री किंवा किशोरवयीन मुलीला किमान एकदा मासिक पाळी येणे आवश्यक आहे. ही ट्रीटमेंट डॉक्टरांच्या देखरेखीखाली घेतली जाते.

आजतकमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सामान्यतः ज्या स्त्रियांना जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होतो त्यांनाच डॉक्टर ही ट्रीटमेंट घेण्याचा सल्ला देतात. परंतु मासिक पाळी येत असलेली कोणतीही महिला सप्रेशन पद्धतीचा अवलंब करू शकते. काहीवेळा या प्रक्रियेदरम्यान हार्मोनल चेंजेस टर्गरचे काम करतात आणि यामुळे अनेक मुलींच्या पोटात आणि डोक्यात असह्य वेदना होऊ शकतात, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वकाही करणे योग्य ठरते.

सर्वप्रथम, ज्या महिला मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम आहेत आणि मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची काळजी घेऊ शकत नाहीत अशा स्त्रियांसाठी मासिक पाळी दडपल्याबद्दल बोलले गेले. नंतर सैन्यात, विशेषत: कठीण क्षेत्रात पोस्ट केलेल्या महिलांचे जीवन सोपे करण्याचा एक मार्ग म्हणून पाहिले गेले. तथापि, या सर्वांशिवाय, अशा अनेक महिला आहेत, ज्या प्रत्येक महिन्याला मासिक पाळीचा त्रास मानतात आणि ते थांबवत आहेत.

सप्रेशन पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी डॉक्टर रुग्णाची योग्य तपासणी करतात. म्हणजे रुग्णाला काही वैद्यकीय इतिहास आहे का किंवा एखादा जुना त्रास किंवा कोणत्याही गंभीर आजाराचे लक्षण असल्यास ही ट्रीटमेंट पुढे ढकलली जाते.

या आहेत काही प्रचलित पद्धती

गर्भनिरोधक गोळ्या : यामुळे मासिक पाळी पूर्णपणे थांबत नाही, उलट प्रवाह हलका होतो. यामध्ये वेदनाही बर्‍याच प्रमाणात सुसह्य होतात.

स्किन पॅच : यामुळे दर 4 महिन्यांनी मासिक पाळी येते.

डेपो प्रोवेरा : ही एक नवीन पद्धत आहे, ज्यामध्ये दर 3 महिन्यांनी शॉट्स घ्यावे लागतात. ज्यांना मासिक पाळी दीर्घकाळ किंवा कायमची थांबवायची आहे अशा स्त्रिया हे सहसा घेतात.

प्रोजेस्टिन आययूडी : या पद्धतीनुसार, डॉक्टर रुग्णामध्ये इंट्रायूटरिन डिव्हाइस घालतात. हे पाच वर्षांसाठी असते.

आजतकच्या बातमीनुसार, या सर्व पद्धतींमध्ये एक गोष्ट समान आहे की, ते प्रोजेस्टिन हार्मोन तयार करतात. हे गर्भाशयाचे अस्तर पातळ करते, ज्यामुळे मासिक पाळीत रक्तप्रवाह हळूहळू थांबतो. IUD मध्ये औषध थेट गर्भाशयावर परिणाम करते तर इतर पद्धतींमध्ये ते अप्रत्यक्षपणे प्रभावित करते.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Periods