मुंबई, 16 जानेवारी : मासिक पाळीच्या काही दिवस आधीपासून पाय दुखणे, नितंब दुखणे, चिडचिड, इरिटेशन, ओटीपोटात दुखणे हे त्रास जाणवतात. त्यात स्तनदुखी म्हणजेच ब्रेस्ट पेनचाही समावेश होतो. काही महिलांना पिरीएड्स येण्यापूर्वी ब्रेस्टमध्ये वेदना होतात. काही वेदना कमी प्रमाणात असू शकतात तर काही जणींना याचा जास्त त्रास होऊ शकतो.
मात्र तुम्हाला माहित आहे का मासिक पाळीत वेदना का होतात? ही सर्व लक्षणे मासिक पाळी येण्यापूर्वी आपल्या शरीराला तयार करण्यासाठी असतात. म्हणजेच मासिक पाळीच्या आधी आपल्या शरीरातून प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे दोन हार्मोन्स स्राव होऊ लागतात. या संप्रेरकांमधील चढ-उतार हे अशा लक्षणांचे कारण आहेत. याला प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणतात.
मेनोपॉजचा सामना करणे अवघड नाही, या टिप्स फॉलो केल्यास शरीरातील बदल पचवणे होईल सोपे
मासिक पाळीच्या दोन ते तीन दिवसांत ही लक्षणे दूर होतात. परंतु कधीकधी त्रास जास्त होऊ शकतो. तेव्हा डॉक्टरांचा घेणे सल्ला घेणे आवश्यक ठरते. डॉ. गरिमा श्रीवास्तव यांनी त्यांचे इंस्टाग्राम हॅण्डल drgarimasrivastav_gynecologist यावर सविस्तर माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या संकेतांवर लक्ष ठेवावे आणि डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता केव्हा असते.
- ब्रेस्टमध्ये किंवा काखेत गुठळ्या, सूज किंवा वेदना होत असल्यास ते गृहीत धरू नका.
- स्तनाग्रांमधून रक्त किंवा द्रव गळतीकडे दुर्लक्ष करू नका.
- स्तनांमध्ये नेहमी एक प्रकारची अस्वस्थता. त्यामुळे तुमच्या कामात अडथळा येतो. जर तुम्हाला नैराश्य येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
- मासिक पाळीच्या नंतरही तुमच्या स्तनांमध्ये तीव्र वेदना होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- जर तुम्हाला स्तनांमध्ये अचानक बदल, लालसरपणा, खाज सुटणे, स्तनाग्रांना इंडेंटेशन इत्यादी जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मासिक पाळीच्या वेदनेत मिळेल त्वरित आराम! शिल्पा शेट्टीने सांगितला रामबाण उपाय
मासिक पाळीच्या वेळी स्तनदुखी दरम्यान काय करावे
- मासिक पाळीदरम्यान घट्ट अंडरवेअर घालू नका. रात्री शक्यतो अंतर्वस्त्रांशिवाय झोपा.
- चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. चहा, कॉफी पिऊ नका. या व्यतिरिक्त शेंगदाणे, पालक, ऑलिव्ह, कॉर्न, केळी, गाजर आणि लिंबू खाऊ शकता.
- चालणे, कोमट पाण्याने आंघोळ केल्याने वेदना कमी होतील.
- नियमित व्यायाम करा.
View this post on Instagram
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breast cancer, Health, Health Tips, Lifestyle, Periods