मुंबई, 16 ऑक्टोबर : मासिक पाळीत वेदना, सूज आणि मूड स्विंग अशा अनेक समस्या बहुतेक महिलांना भेडसावतात. या समस्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात. याशिवाय, एक समस्या आहे जी मासिक पाळीच्या शेवटपर्यंत त्रास देते, ती म्हणजे पीरियड रॅश म्हणजेच पुरळं येणे. पीरियड रॅशमुळे चालणे आणि बसण्यातही त्रास होतो. सॅनिटरी नॅपकिनचा वापर, जास्त ओलावा आणि नॅपकिन त्वचेवर घासल्यामुळे ही समस्या उद्भवते. बहुतेक सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरानेदेखील जळजळ होऊ शकते. अनेकांना त्वचेवर लालसरपणा आणि खाज येण्याचाही सामना करावा लागतो. हे रॅश उष्णता आणि आर्द्रतेमुळे होऊ शकतात. पॅड्समुळे होणारे रॅश 3 ते 4 दिवस त्रास देतात. काहीवेळा हे रॅशेस कटमध्येदेखील बदलतात. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या रॅशपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय केले जाऊ शकतात. त्याबद्दल जाणून घेऊया.
सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना महिलांनी ‘या’ चुका करणं टाळा, नाहीतर होईल मोठं नुकसानकडुलिंबाचे पाणी गेल्या अनेक वर्षांपासून कडुलिंबाचा उपयोग अनेक समस्या दूर करण्यासाठी केला जात आहे. हेल्थशॉट्सनुसार, कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे संक्रमण दूर करण्यात मदत करतात. मासिक पाळीमुळे होणारे रॅश बरे करण्यासाठी कडुलिंबाचा वापर केला जाऊ शकतो. त्याचा वापर करण्यासाठी 20 कडुलिंबाची पाने पाण्यात काही वेळ उकळा. नंतर पाणी खोलीच्या तापमानाला थंड होऊ द्या. नंतर या पाण्याने बाधित भाग नीट धुवा. कडुलिंबाचे पाणी आंघोळीसाठीही वापरता येते.
बर्फ वेदना आणि सूज कमी करण्यात बर्फ महत्त्वाची भूमिका बजावते. बर्याच वेळा पीरियड रॅशमध्ये जळजळ होण्याची आणि वेदना होण्याची समस्यादेखील असते, अशा परिस्थितीत आईस कॉम्प्रेसने आराम मिळू शकतो. बर्फ वापरण्यासाठी, काही बर्फाचे तुकडे एका स्वच्छ कपड्यात घ्या आणि पुरळाच्या सभोवतालची जागा दाबा. याने सूज, वेदना आणि जळजळीपासून त्वरित आराम मिळेल. खोबरेल तेल खोबरेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे पॅड्समुळे होणाऱ्या रॅशपासून सुटका मिळते. हे पुरळांमुळे होणारी कोरडी त्वचा मऊ करण्यासाठीदेखील कार्य करू शकते. ते वापरण्यासाठी, प्रथम प्रभावित भाग थंड पाण्याने स्वच्छ करा आणि नंतर कापसाच्या मदतीने त्यावर खोबरेल तेल लावा. रात्री हे लावल्याने झोपल्यास सकाळपर्यंत आराम मिळतो. Married Life : दारूचा लैंगिक संबंधांवर खरंच परिणाम होतो? वाचा काय म्हणतात डॉक्टर मासिक पाळीदरम्यान रॅश कसे टाळावे? - प्लास्टिकच्या लेपऐवजी कॉटन पॅड वापरा. - पॅड्स व्यतिरिक्त, तुम्ही मासिक पाळीचे कप आणि टॅम्पन्स वापरू शकता. - सिंथेटिक आणि घट्ट बसणारे कपडे घालणे टाळा. - सुगंधी पॅड वापरू नका. रसायनांमुळे नुकसान होऊ शकते. - दर 3-5 तासांनी पॅड बदला.