जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना महिलांनी 'या' चुका करणं टाळा, नाहीतर होईल मोठं नुकसान

सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना महिलांनी 'या' चुका करणं टाळा, नाहीतर होईल मोठं नुकसान

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

जर शौचालय भारतीय नसून इंग्लीश असेल तर मात्र आणखी त्रास होऊ शकतो, अशावेळी मात्र बहुतेक महिला या स्कॉट करत शौचालयाचा वापर करण्यास प्राधान्य देतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 15 ऑक्टोबर : आपल्याला तर हे माहित आहे की, सार्वजनिक शौचालय हे कधीही चांगले नसतात. तिथे नेहमीच अस्वच्छता आणि दुर्गंध येत असतो. पुरुषांसाठी हे ठिक आहे. परंतू महिलांसाठी मात्र असे अस्वच्छ शौचालय अजिबात चांगले नाहीत. कारण महिलांना लघवीच्या जागेतून इन्फेक्शन होण्याची शक्यता फार जास्त आहे आणि याचे गंभीर परिणाम देखील होतात. त्यात जर शौचालय भारतीय नसून इंग्लीश असेल तर मात्र आणखी त्रास होऊ शकतो, अशावेळी मात्र बहुतेक महिला या स्कॉट करत शौचालयाचा वापर करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांना तेथील घाणीतून संसर्ग होऊ नये. अर्थात, सार्वजनिक स्वच्छतागृहे अतिशय गलिच्छ आणि खराब असल्याने महिलांना त्रास होऊ शकतो. हे ही वाचा : Married Life : दारूचा लैंगिक संबंधांवर खरंच परिणाम होतो? वाचा काय म्हणतात डॉक्टर यामुळे आम्ही तुमच्यासाठी यासंदर्भात एक माहिती घेऊन आलो आहोत. तज्ज्ञांच्या मते, सार्वजनिक शौचालय वापरताना महिलांनी काय करू नये याची तुम्हाला माहिती मिळेल. सार्वजनिक शौचालयात काय करू नये? -बहुतेक स्त्रिया सार्वजनिक शौचालय वापरताना स्क्वॅट करणे पसंत करतात, परंतू असे करु नका. डॉक्टरांच्या मते, ही पद्धत महिलांच्या पेल्विक फ्लोर वीक बनवते. जर एखादी महिला वारंवार असे करत असेल तर तिच्या गर्भाशयाच्या पेल्विक स्नायूंना त्रास होइल. सार्वजनिक शौचालयांमुळे UTI किंवा STI होऊ शकते का? हे खरे आहे की सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये बरेच जीवाणू आणि विषाणू असतात, परंतु तुम्हाला टॉयलेट सीटवरून UTI किंवा STI सारखी समस्या येऊ शकते, परंतु हे फार दुर्मिळ प्रमाणात होते. त्यामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही असं देखील डॉक्टर सांगतात. हे ही वाचा : VIDEO - महिलेचा डोळा उघडून पाहताच डॉक्टर हादरले; एका सवयीचा दिसला भयानक परिणाम पेल्विक फ्लोरशी संबंधित समस्या टाळायच्या असल्यास काय करावे? -केगल व्यायाम करा -जास्त वेळ लघवी रोखून ठेवू नका -कुठेही लघवी करणे थांबवा -पेल्विक फ्लोर वीक असल्यास किंवा तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या -तुमची जीवनशैली योग्य ठेवा जी सर्वात मोठी समस्या बनू शकते -दारू आणि धूम्रपान टाळा

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात