जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 6 बोटे असणाऱ्या लोकांची ही खासियत अनेकांवर ठरते प्रभावी; म्हणून अत्यंत कुशाग्र मानले जातात

6 बोटे असणाऱ्या लोकांची ही खासियत अनेकांवर ठरते प्रभावी; म्हणून अत्यंत कुशाग्र मानले जातात

6 बोटे असणाऱ्या लोकांची ही खासियत अनेकांवर ठरते प्रभावी; म्हणून अत्यंत कुशाग्र मानले जातात

ज्या लोकांची 6 बोटे आहेत ते कामाच्या बाबतीत पाच बोटे असलेल्या लोकांपेक्षा चांगले असतात. ज्यांना भगवंताकडून 6 बोटांचे वरदान मिळाले आहे, ते मनाने अत्यंत कुशाग्र मानले जातात. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 जुलै : काही लोकांच्या हाताला 6 बोटे असतात किंवा काही लोकांच्या पायालाही 6 बोटे असतात. हे सहावे बोट अंगठ्याच्या बाजूला किंवा करंगळीच्या बाजूला असते. ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या हाताला किंवा पायाला 6 बोटे असतात ते भाग्यवान मानले जातात. भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा, सांगतात की 6 बोटे असलेले लोक ज्या व्यक्तीसोबत राहतात त्यांच्यासाठी भाग्यवान ते असतात. याशिवाय जर्मनीतील फ्रीबर्ग युनिव्हर्सिटी आणि इम्पिरियल कॉलेजमध्ये झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, ज्या लोकांची 6 बोटे आहेत ते कामाच्या बाबतीत पाच बोटे असलेल्या लोकांपेक्षा चांगले असतात. ज्यांना भगवंताकडून 6 बोटांचे वरदान मिळाले आहे, ते मनाने अत्यंत कुशाग्र मानले जातात. 6 बोटांच्या लोकांची एक खासियत आहे की, असे लोक प्रत्येक गोष्टीत संतुलन राखू शकतात. याविषयी ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्र काय सांगते - ज्या व्यक्तीच्या हाताच्या किंवा पायाच्या करंगळीजवळ अतिरिक्त बोट असते, त्याच्यावर बुध पर्वताचा प्रभाव जास्त असतो. दुसरीकडे, ज्या लोकांच्या अंगठ्याजवळ अतिरिक्त बोट असते त्यांच्यावर अधिक परिणाम होतो. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे असे लोक कुशाग्र बुद्धीचे असतात. कुशाग्र बुद्धीमुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. या लोकांची काम करण्याची क्षमता इतर लोकांपेक्षा चांगली असते. हे वाचा -  उन्हाळ्यात दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी या 5 गोष्टी आहेत महत्त्वाच्या शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक खूप कलाप्रिय आणि शौकीन असतात. नवनवीन ठिकाणी फिरायला त्यांना खूप आवडतं. अशा व्यक्ती खूप मेहनत आणि प्रामाणिकपणाने पैसा कमावतात आणि हा पैसा राजेशाही जीवन जगण्यात खर्च करतात. हे वाचा -  तरुण वयातील हा त्रास उतारवयात अनेक अडचणी आणू शकतो; आत्तापासूनच घ्या काळजी पंडितजी म्हणतात की, हस्तरेषा शास्त्रानुसार 6 बोटे असलेले लोक भाग्यवान असतात. ते इतरांच्या कामातील उणीवा शोधून काढतात, त्यामुळे या लोकांना चांगले समीक्षकही म्हणतात. मात्र, काही वेळा चुका झाल्यामुळे त्यांचे लोकांशी असलेले नातेही बिघडते. (सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात