नवी दिल्ली, 25 मे : ग्रीष्म ऋतू हा बर्याच लोकांसाठी उत्साहाचा, सुट्टीचा काळ असतो. उष्णता आणि आर्द्रता असूनही उन्हाळी हंगाम नेहमीच आनंददायी असतो. कारण, या काळात आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी भेट देण्याची नवीन खाद्यपदार्थ आणि पेये वापरून आपल्या कुटुंबासमवेत सुट्टी घालवण्याची संधी मिळते. पण, या सगळ्या उत्साहात आणि मौजमजेदरम्यान, आपण खाताना अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्यामध्ये अनेक वेळा नकळत आपण आपल्या दातांचे आरोग्य बिघडवतो.
तोंडाची स्वच्छता राखण्यासाठी काळजी घेतली नाही तर आपल्याला तोंडाच्या अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. उन्हाळ्यात मौजमजा करताना तोंड आणि दात नेहमी निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स आहेत, त्याविषयी जाणून घेऊया.
दातांची स्वच्छता राखणे -
दिवसातून दोनदा दात घासणे आणि दिवसातून एकदा फ्लॉस (दांतांच्या मध्ये धाग्याने सफाई) करणे हा दातांना मजबूत आणि निरोगी ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. जसजसे हवामान गरम होते, तसतसे बरेच लोक जास्त साखरयुक्त पदार्थ आणि पेये खातात, ज्यामुळे उन्हाळ्याच्या महिन्यात तोंडाची स्वच्छता अधिक महत्त्वाची बनते.
जास्त पाणी प्या -
उष्ण हवामानात हायड्रेटेड राहणे अवघड असल्याने, दातांच्या स्वच्छतेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
गोडावर नियंत्रण -
आपल्या सर्वांना माहीत आहे की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या हा विश्रांतीचा, आनंदाचा आणि मौजमजेचा काळ असतो. परंतु, तुम्ही कँडी, बेक केलेले पदार्थ आणि इतर प्रकारच्या मिठाईचे पदार्थ जास्त खाणे टाळले पाहिजे. आपल्याला माहिती आहेच की, जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना लवकर कीड लागू शकते.
हे वाचा - मंगळवारी कोणालाच उधार पैसे द्यायचे-घ्यायचे नसतात; अनेक अडचणी नंतर डोकेदुखी ठरतात
अतिनील किरणांपासून ओठांचे रक्षण -
आपल्या ओठांमध्ये जळजळ होण्याचा धोका असतो, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ओठांचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन वापरण्यास विसरू नका. बाहेर वेळ घालवताना, तुम्ही SPF 15 किंवा त्याहून अधिक दर्जाचे लिप बाम वापरू शकता.
हे वाचा - कुठे मीठ मागायचं नाही तर, कुठे किटली धूत नाहीत; जगात खाण्यासंबंधी आहेत अजब प्रथा
मद्यपान आणि धूम्रपान नको -
मद्यपान आणि धूम्रपानाच्या सवयी अनेक अडचणी निर्माण करणाऱ्या आहेत. यामुळे हिरड्यांचे आजार, हिरड्यांचे ऊतींचे नुकसान, हाडांची झीज आणि दुर्गंधी यांचा समावेश आहे. आपले मौखिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी धूम्रपान थांबविण्याचा सल्ला दिला जातो.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Summer, Summer season