'या' कारणानं तणाव कमी होण्याऐवजी वाढतोच

'या' कारणानं तणाव कमी होण्याऐवजी वाढतोच

हल्लीच्या लाइफस्टाइलमुळे लोकांमध्ये खूप तणाव वाढलाय. वैयक्तिक आयुष्यात आणि प्रोफेशनल आयुष्यातही. त्याचं हेही एक कारण असल्याचं समोर आलंय.

  • Share this:

मुंबई, 31 मे : हल्लीच्या लाइफस्टाइलमुळे लोकांमध्ये खूप तणाव वाढलाय. वैयक्तिक आयुष्यात आणि प्रोफेशनल आयुष्यातही. आॅफिसमध्ये परफाॅर्मन्सचं टेंशन, नाती तुटण्याचा तणाव या गोष्टी होतंच राहतात. अनेकदा आपलं मन मोकळं, तणावरहित करण्यासाठी लोक फेसबुकवर जातात किंवा सोशल मीडिया वारंवार तपासत राहतात. असं केल्यानं मन थोडा वेळ तणावापासून दूर राहतं. पण खूप वेळ असं केल्यानं व्यक्ती फेसबुकसारख्या सोशल साइटवर अवलंबून राहायला लागतात. एका संशोधनात हे समोर आलं की मग अशांना सोशल मीडियाचं व्यसन लागतं.

सेल्फी उलगडेल तुमचं गुपित, सांभाळून काढा PHOTO

या आॅनलाइन संशोधनात 18 ते 56 वर्षांच्या 309 फेसबुक युजर्सचा समावेश होता. या सर्वेची मुख्य ज्युलिया ब्रॅलोव्सकाया यांनी सांगितलं की यात आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी बोललो. कारण विद्यार्थी जीवनात बराच तणाव असतो. पालकांचाही मुलांवर चांगल्या मार्कासाठी दबाव असतो. कधी कधी काहींना अचानक नोकरी सोडून बाहेरच्या जगात नोकरी करायला पडावं लागतं.

... म्हणून जोडीदाराशी नेहमी वाद घालत राहा

सायकीयाट्री रिसर्च नावाच्या पुस्तिकेत हे संशोधन प्रसिद्ध झालंय. यात लोकांना प्रश्न विचारले गेले, सोशल साइट्स तुमचा तणाव किती कमी करू शकतात? आॅनलाइन किंवा आॅफलाइन राहिल्यानं लोकांशी भावनात्मक किती जोडले जाता? रोज तुम्ही किती वेळ सोशल साइटवर काढता? आॅनलाइन नसाल तेव्हा कसं वाटतं?

Life In लोकल- बाबा आज तुमचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे म्हणून...

या संशोधनात हेही समोर आलंय की जे लोक जास्त काळ सोशल मीडियावर काढत होते, ते तणावग्रस्त होते. फेसबुक किंवा इतर सोशल साइट्सवर जास्त वेळ घालवला तर हाच तणाव आणखी वाढतो. अशा वेळी कुटुंब, मित्र-मैत्रिणी यांची मदत घेतली तर सोशल मीडियाचं व्यसन सुटू शकतं.


VIDEO : मान्सून आगमनानंतर हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: stress
First Published: May 31, 2019 06:03 PM IST

ताज्या बातम्या