... म्हणून जोडीदाराशी नेहमी वाद घालत राहा

... म्हणून जोडीदाराशी नेहमी वाद घालत राहा

या संशोधनात 192 विवाहित जोडप्यांचा समावेश केला गेला. या जोडप्यांना त्यांच्या खासगी जीवनाबद्दल प्रश्न विचारले गेले.

  • Share this:

मुंबई, 30 मे : नात्यात फक्त प्रेम आणि रोमान्स असेल तर सुरुवातीला छान वाटतं. पण काही दिवसांनी नात्यातला स्पार्क संपून जातो. एका संशोधनातून हे समोर आलंय की जी जोडपी एकमेकांशी वाद घालतात, रुसवे फुगवे होतात त्यांच्यातलं प्रेमही गहिरं होतं. जी जोडपी भांडतात त्यांचं आयुष्य वाढतं. अर्थात, ही भांडणं फार गंभीर नसतात. ती हलकीफुलकी असतात.

या संशोधनाच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतल्या जोडप्यांमध्ये महिन्यातून 19 वेळा वाद होतात. ते एकमेकांशी 5 दिवस बोलत नाहीत. एकत्र येत नाहीत. पण अनेकदा यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं. पण ही भांडणं साधी असतात. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम कमी होत नाही.

सेल्फी उलगडेल तुमचं गुपित, सांभाळून काढा PHOTO

या संशोधनात 192 विवाहित जोडप्यांचा समावेश केला गेला. या जोडप्यांना त्यांच्या खासगी जीवनाबद्दल प्रश्न विचारले गेले. त्यावरून हे समोर आलं की जी जोडपी नेहमी वाद घालत त्यांचं आयुष्य जास्त वर्ष होतं.

जी जोडपी अजिबात भांडत नाहीत ती एकमेकांबरोबर कम्फर्टेबल नसतात. यात एकमेकांविषयी वाटणारी भीती असते. पण जे एकमेकांबरोबर नेहमीच वाद घालत असतात, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं, असं सायकाॅलाॅजिस्टचं म्हणणं आहे.

मृत्यूनंतर आपोआप डिलिट होणार तुमचं गुगल अकाउंट, जाणून घ्या कसं

सायकाॅलाॅजिस्टच्या म्हणण्यानुसार एकमेकांवर गाढ प्रेम असणारेच एकमेकांशी वाद घालताना अनेकदा नकारात्मक बोलतात. पण त्यामुळेच त्यांच्या नात्याला उत्तेजना मिळते.

डाॅक्टरांच्या मते अनेकदा इतर ताणतणाव आपल्या जवळच्या व्यक्तीसमोरच बाहेर येतात. इतर फ्रस्ट्रेशन्स अगदी जवळच्या व्यक्तीसमोर उघड होतात. म्हणून जोडप्यांमधले वाद हे हेल्थी रिलेशनशिपचं लक्षण आहे.

शाहीद कपूरने शेअर केलेले व्हेकेशन फोटो पाहिलेत? 'ही' आहेत जगातली टाॅप 5 बिच डेस्टिन्शन्स

प्रत्येक माणसाच्या दोन बाजू असतात. ज्या जोडप्यांमध्ये वाद होतात, ते आपली दुसरी बाजूही आपल्या जोडीदारासमोर उघड करतात. त्यात जास्त मोकळेपणा आणि आपलेपणा असतो.

VIDEO : ''मैं नरेंद्र दामोदरदास मोदी...'', अशी घेतली पंतप्रधानपदाची शपथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: couplelove
First Published: May 30, 2019 07:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading