Home /News /lifestyle /

जी लोक उच्चभ्रू भागात राहतात ती जास्त जगतात, संशोधनाचा असाही दावा

जी लोक उच्चभ्रू भागात राहतात ती जास्त जगतात, संशोधनाचा असाही दावा

 गरीब प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना आर्थिक, सामाजिक अशा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं

गरीब प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना आर्थिक, सामाजिक अशा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं

गरीब प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना आर्थिक, सामाजिक अशा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं

    लंडन, 14 जानेवारी : कोण किती काळ जगेल, हे कधीच नेमकं सांगता येत नाही; पण अलीकडच्या काळात यावरही संशोधन ( research) होऊ लागलं आहे. एखाद्या व्यक्तीचं आयुष्य (life) किती असू शकते, यावरही संशोधन करण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये ( Britain) झालेल्या एका संशोधनात असं समोर आलं आहे, की एखादी व्यक्ती किती काळ जगेल, हे ती व्यक्ती कुठे राहते, यावरही अवलंबून असतं. 'पॉश एरियामध्ये ( posh areas) म्हणजेच ज्या भागात श्रीमंत व्यक्ती ( rich people) राहतात, अशा उच्चभ्रू भागातले नागरिक तुलनेने जास्त जगतात. वंचित भागात ( deprived areas) राहणारे नागरिक पॉश भागात राहणाऱ्या नागरिकांपेक्षा कमी आयुष्य जगतात,' असं या संशोधनाच्या अहवालामध्ये म्हटलंय. इंग्लंडमधल्या गरीब भागात राहणाऱ्या नागरिकांबद्दल संशोधनातून असं समोर आलं आहे की, त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता इतर नागरिकांच्या तुलनेत 46 टक्के जास्त आहे, असं वृत्त 'झी न्यूज'ने दिलं आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, गरीब प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना आर्थिक, सामाजिक अशा अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे त्यांचं आयुष्य आपोआपच काही वर्षांनी घटतं. त्या वृत्तात ब्रिटनमधल्या काही वंचित भागांचा संदर्भ देत म्हटलं आहे की, 'तेथे राहणारे नागरिक श्रीमंत भागात राहणाऱ्या नागरिकांपेक्षा 7.5 वर्षं कमी जगतील. किंबहुना, संशोधकांनी एक कॅल्क्युलेटर तयार केला आहे, ज्याद्वारे त्यांनी जन्मतारीख आणि लिंगाच्या आधारे सध्याच्या परिस्थितीत कोण जास्तीत जास्त काळ जगू शकतं, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी! बॉम्बे इंजिनीअर ग्रुपतर्फे विविध पदांसाठी भरती) धूम्रपान आणि हृदयविकारामुळे होणार्‍या मृत्यूचं प्रमाण कमी झाल्यामुळे पुरुषांमधल्या मृत्यूचं प्रमाण महिलांच्या तुलनेत वेगाने कमी होत आहे. परंतु 2020 पासून, यामधला जेंडर गॅप लक्षणीयरीत्या वाढला आहे. कारण कोविड-19 मुळे महिलांपेक्षा पुरुष जास्त बळी पडत आहेत, असंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पुरुष आणि स्त्री यांच्यातला गुणसूत्रांमधला फरक मृत्युदरावर परिणाम करतो. याचा अर्थ स्त्री दीर्घकाळ जगण्यासाठी जैविकदृष्ट्या मजबूत असते. याशिवाय धूम्रपानासारख्या इतर कारणांमुळेही पुरुषांचं आयुष्य घटतं. संशोधकांचं म्हणणं आहे की, 'यूकेमध्ये राहणारे 50 वर्षांचे पुरुष वयाची 100 वर्षं पूर्ण करण्याची शक्यता केवळ 4.4 टक्के असते. परंतु महिलांसाठी तेच प्रमाण 7.4 टक्के आहे. त्याचप्रमाणे, या वर्षी जन्मलेल्या मुलींमध्ये वयाची शंभरी पूर्ण करण्याची शक्यता 19 टक्के आहे, तर मुलांमध्ये हे प्रमाण केवळ 13.4 टक्के आहे.' या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, 'महिला नेहमीच पुरुषांपेक्षा चांगलं जगतात. परंतु दोघांच्या आयुष्यातला फरक सतत बदलत आहे.' (सहा जागा, 700 विद्यार्थी परीक्षेला, महाराष्ट्राचे 60 ते 70 मुलं आसाममध्ये अडकले) प्रत्येक व्यक्तीला निरोगी जगायचं असतं आणि दीर्घायुषी व्हायचं असतं. दीर्घायुषी होण्यासाठी काय करावं, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर काही प्रमाणात का होईना, पण ब्रिटनमधल्या या संशोधनातून मिळालं आहे.
    First published:

    Tags: Research

    पुढील बातम्या